अदा शर्मा रुग्णालयात दाखल, कमांडो वेब मालिकेच्या प्रमोशनदरम्यान बिघडली तब्येत

    03-Aug-2023
Total Views |

ada sharma






मुंबई :
‘द केरला स्टोरी’ चित्रपटामुळे अधिक प्रसिद्धी मिळवणारी अभिनेत्री अदा शर्मा हीची तब्येत बिघडल्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार तिला तिला फूड ऍलर्जी झाली आहे. अदा शर्माच्या जवळच्या व्यक्तीने माध्यमांशी बोलताना तिच्या तब्येतीविषयी माहिती दिली. त्या व्यक्तीने सांगितले की, अभिनेत्रीला आगामी ‘कमांडो’ शोच्या प्रमोशनपूर्वी मंगळवारी १ ऑगस्ट रोजी तातडीने रुग्णालयात न्यावे लागले. सध्या अदा तिच्या आगामी ‘कमांडो’ या वेब मालिकेच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.
 
‘द केरला स्टोरी’ चित्रपटाच्या यशानंतर आता अदा शर्मा आणि विपुल शाह पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. विपुल यांनी कमांडो या वेब मालिकेचे दिग्दर्शन केले आहे. यामध्ये वैभव तत्ववादी, श्रेया सिंग चौधरी, अमित सियाल, तिग्मांशू धुलिया, मुकेश छाब्रा आणि इश्तेयाक खान यांच्याही भूमिका असणार आहेत.
 
‘कमांडो’ या फ्रँचायझीची सुरुवात २०१३ साली अभिनेता विद्युतची प्रमुख भूमिका असलेल्या ‘कमांडो: अ वन मॅन आर्मी’ या चित्रपटापासून सिनेमापासून झाली होती. यानंतर या चित्रपटाचे काही भाग आले आणि प्रेक्षकांच्या पसंतीस उतरु लागले. प्रेक्षकांची चांगली पसंती मिळालेल्या ‘कमांडो’ या चित्रपटापासून प्रेरित होत आता कमांडो ही वेब मालिका डिस्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी वाहिनीवर ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.