'पीएमजीएसवाय'अंतर्गत अरुणाचलमध्ये ९१ रस्ते आणि ३० पुलांच्या नुतनीकरणाला केंद्राची मंजुरी : रिजिजू
नवी दिल्ली : पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत अरुणाचल प्रदेशातील ७२०.७५ किलोमीटर लांबीचे ९१ रस्ते आणि ३० लांब पल्ल्याच्या पुलांच्या नुतनीकरणाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे,अशी माहिती केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी रविवारी दिली.पृथ्वी विज्ञान मंत्री रिजिजू यांनी एका निवेदनात म्हटले आहे की,या प्रकल्पांची एकूण अंदाजे किंमत 757.58 कोटी रुपये आहे.
केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाने मंजूर केलेले हे प्रकल्प लवकर पूर्ण करण्यावर भर देताना ते म्हणाले की,या विकास कामामुळे चांगलांग,दिबांग खोरे,पूर्व कामेंग,पूर्व सियांग,कामले,क्रा दादी,कुरुंग कुमे, लेपा राडा,लोहित,लोंगडिंग आणि लोअर दिबांग व्हॅली अशा विविध जिल्ह्यांतील ५०० वस्त्यांमध्ये ग्रामीण कनेक्टिव्हिटी सुधारेल.
शाळा,कृषी बाजार आणि आरोग्य केंद्रांमध्ये विद्यार्थी,शेतकरी आणि रुग्णांना चांगल्या प्रकारे पोहोचता येईल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.रिजिजू म्हणाले की,शैक्षणिक संस्थांमध्ये चांगल्या प्रवेशामुळे शाळेतील उपस्थिती आणि उच्च शिक्षण सुधारण्यास मदत होईल.'
या पायाभूत सुविधेमुळे बिझनेस इको सिस्टीमला फायदा व तसेच अनेक विद्यार्थ्यांची पायवाट सुकर होईल अशी चिन्हे आहेत.