'PAPA' च्या साहाय्याने 'आदित्य L1' करणार सूर्यमोहीम!
29-Aug-2023
Total Views | 54
मुंबई : चांद्रमोहीमेच्या यशानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) सूर्यमोहीम हाती घेतली आहे. आदित्य L1 असे या मोहीमेचे नाव असून २ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजून ५० मिनिटांनी पीएसएलव्हीच्या माध्यमातून हे यान श्रीहरीकोटा येथुन पाठविण्यात येणार आहे.
या मोहीमेद्वारे सूर्याचे तापमान, अतिनील किरणांचा पृथ्वीवर होणारा परिणाम, ओझोनचा थर, अंतराळातील हवामान, सौरवादळं आणि त्याचा पृथ्वीवर होणारा परिणाम या सर्व गोष्टींचा अभ्यास करण्यात येणार आहे.
या अभ्यासासाठी वेगवेगळे सात पेलोड यानासोबत पाठविण्यात येणार आहेत. VELC, SUIT, SoLEXS, HEL10S, ASPEX, PAPA, MAG अशी या पेलोडची नावे असून यातील 'PAPA' म्हणजे 'प्लाज्मा अॅनलायझर पॅकेज फॉर आदित्य' हे सौर वारे व त्याची रचना समजून घेण्यासाठी तसेच ऊर्जा वितरणाचा अभ्यास करण्यासाठी बनविण्यात आले आहे. हे पेडोल विक्रम साराभाई अंतराळ केंद्र, तिरुवनंतपुरम येथील स्पेस फिजिक्स लॅबोरेटरीमध्ये तयार केले आहे.