२०२० मधील ‘म्हाडा’ सोडतीतील गिरणी कामगार विजेत्यांना आज चावीवाटप

    29-Aug-2023
Total Views | 25
MHADA Lottery For Mill Workers

मुंबई : ‘म्हाडा’च्या मुंबई मंडळातर्फे २०२० मध्ये गिरणी कामगारांसाठी जाहीर सोडतीतील १२५ यशस्वी गिरणी कामगारांना मंगळवार, दि. २९ ऑगस्ट रोजी सदनिकांच्या चाव्यांचे वाटप राज्याचे गृहनिर्माणमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

वांद्रे पूर्व येथील ‘म्हाडा’ मुख्यालयातील गुलजारीलाल नंदा सभागृह येथे दुपारी ४ वाजता आयोजित या कार्यक्रमाला गिरणी कामगार घर सनियंत्रण समितीचे अध्यक्ष व आमदार सुनील राणे, आमदार कालिदास कोळंबकर, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार शिवेंद्रराजे भोसले, ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल, मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर, कामगार आयुक्त सतीश देशमुख आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

२०२० मध्ये गिरणी कामगारांसाठी जाहीर सोडतीतील ३,०३८ पैकी ८५६ यशस्वीतांना आतापर्यंत तीन टप्प्यांतर्गत सदनिकांच्या चाव्यांचे वाटप करण्यात आले आहे. चावीवाटपाच्या चौथ्या टप्प्यांतर्गत आयोजित या कार्यक्रमाला संबंधित गिरणी कामगार/वारस यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121