नाशिक : शेकडो पक्ष्यांचा आवाज एकत्रित करुन चित्रपटतातील गीताला निसर्गातील पशुपक्ष्यांच्या आवाजातील संगीत देणारे नाशिकचे संगीतकार धनंजय धुमाळ यांनी भारतीय चंद्रयान मोहिमेला समुहगीताने अभिवादन केले आहे. या गीताची लिंक यूट्यूबवर प्रसारित होताच हजारोच्या संख्येने त्यांना लाईक मिळत आहेत.
इस्त्रोचे संशोधकांनी चंद्रयान-3 साठी प्रचंड मेहनत घेऊन जगात हिंदुस्थानची संशोधन मोहिमेला मोठी उंची प्राप्त करुन दिली. हे सर्व टिव्हीवरुन लाईव्ह पाहताना धुमाळ यांच्या मनात ‘इस्त्रो‘ या अभियानाचा, समुह कार्याचा गौरव संगीताच्या माध्यमातून करत प्रेरणादायक गीत तयार करण्याची कल्पना सुचली आणि सुरु झाला नवनिर्मितीचा सुरेल प्रवास..!
धुमाळ यांनी ही संकल्पना ज्येष्ठ शास्त्रज्ञ दर्शना शाह यांना सांगितली. यापूर्वीचे ‘वंदेमातरम’ हे गीत पुन्हा नवीन संगीतबद्ध करून प्रदर्शित करण्यात आले तेव्हा धुमाळ यांना त्यांच्या बरोबर निर्मिती संदर्भात शाह यांची मदत झाली होतीच. ‘मिशन चंद्रयान’ गाण्यासाठी धुमाळ यांनीच गीत लिहावे असे शाहह यांनी धुमाळ यांना सुचविले.
अंगात चैतन्य पसरावे या झटक्यात अवघ्या काही तासातच धनंजय धुमाळ यांचे गीतही लिहून तयार केले. काही तासातच चाल बांधून संगीत संयोजन, वादन आदी गोष्टी धुमाल यांच्याच डी. आर. डी.रेकॉर्डींग स्टुडिओत सुरू झाल्या. प्रचंड राष्ट्रभक्तीने प्रेरित होऊन चंद्रयान मोहिमेला अभिवादन करण्यासाठी साकारले सुरेख गीत. "प्रेमभावसे रहते है विजयपथ पर चलते है हम...!"
पहिल्याच दिवशी गीताला यूट्यूबवर हजारो नेटीजन्सनी लाईक दिल्या. आता गीताचे हिंदुस्थानातच नव्हे तर विदेशातील भारतीयांमध्येही कौतुक होत आहे.कारण हे चाकोरीबद्ध गीत नव्हे तर देशाने यशस्वी केलेल्या चंद्रमोहिमेला मानवंदना देणारे आणि भारतीयांमध्ये देशाप्रती, इस्त्रोप्रती जाज्वल प्रेम, सार्थ अभिमान यांची पेरणी करणारे समुह गौरव गीत झाले आहे.निर्मितीत सहकार्यांनी एकत्र येऊन आपल्या देशासाठी विनामूल्य सहकार्य करत ‘मिशन चंद्रयान ’समुहगीत भारत देशाला समर्पित केले आहे.
चंद्रयान मोहीमेवरील जगातील पहिलेच समुह गीत
यूट्ूयबवर चंद्रयान मोहीमेचे प्रचंड कव्हरेज सुरु होते. हिंदुस्थानची ’इस्त्रो’ प्रचंड आत्मविश्वासाने मोहीमेला मूर्त स्वरुप देत होते. त्यांच्या पाठीवर संगीतातून पाठीवर थाप द्यावी म्हणून मी हे गीत तयार करुन यूट्यूबरच टाकले. एकसंध हिंदुस्थान रहावा ही सर्वांचीच इच्छा असते. संपूर्ण जगात चंद्रयान मोहिमेचे गौरव करणारे आणि भारतीयांना प्रेरणा देणारे समुहाने गायले गेलेले हे पहिले समुहगीत आहे.
- धनंजय धुमाळ
(समुह गीताचे सर्वेसर्वा.)
यांनी दिला स्वर....
समुहगीत गायनासाठी जेष्ठ पार्श्वगायिका लतादिदी आर धुमाळ, प्रा. आनंद अत्रे, डॉ. क्षमा अघोर, हर्षद वडजे, मंजुषा धनंजय धुमाल, श्रृती धुमाळ , विजय धुमाळ, परिणिता धुमाळ यांच्यासह स्वत: धनंजय धुमाळ यांनीही स्वर दिलाइतकेच नव्हे तर धुमाळ यांनी निर्मितीसह संगीत संयोजन, संगीत, व्हिडीओ एडिटिंग व दिग्दर्शनाची जवाबदारीही लिलया पेलली. रेकॉर्डींग व व्हिडिओ एडीटिंग ..डी आर डी रेकॉर्डींग स्टुडिओ एन एस के मध्ये झाले या गाण्याचे मिक्सिंग आणि मास्टरींग विजय धनंजय धुमाळ यांनी केले. ग्राफिक डिवाईन प्रथमेश कानडे याने केले.