प्रवचन व व्याख्यानातून महिलांशी मुक्त संवाद

यशवंतराव चव्हाण सेंटर, ठाणे येथे कार्यक्रम संपन्न

    29-Aug-2023
Total Views |

Thane


ठाणे :
महिला समानता दिनाचे औचित्य साधून यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबईच्या ठाणे केंद्र आणि आम्ही सिद्ध लेखिका यांच्या संयुक्त विद्यमाने वारकरी भवनात "महिलांचे अधिकार आणि हक्क" या विषयावर ऍड.निर्मला सामंत यांनी उत्स्फूर्त व्याख्यान दिले. अनेक क्षेत्रातील कायदेविषयक माहिती देऊन महिलांशी मुक्त संवाद साधला.
 
या कायदेविषयक माहिती नंतर श्रावण महिन्याच्या निमित्ताने प्रसिद्ध निरूपणकार प्राची गडकरी यांचे "देवाचिये द्वारी" या विषयावर अतिशय रसाळ प्रवचन झाले. यावेळी व्यासपीठावर यशवंतराव चव्हाण सेंटरचे ठाणे अध्यक्ष मुरलीधर नाले, सचिव अमोल नाले आणि आम्ही सिद्ध लेखिका संस्थेच्या अध्यक्षा प्रा.पद्मा हुशिंग आदी उपस्थित होते.तर कार्यक्रमास संस्थेच्या सचिव वृषाली राजे, विश्वस्त आशालता कुलकर्णी, उषाताई चांदुरकर, आ.भारती मेहता, प्रा.विजया पंडितराव, शुभांगी गान आदींसह कार्यकारणी पदाधिकारी व सदस्यांची उपस्थिती होती.
 
सुत्रसंचलन स्वाती दोंदे यांनी केले. तर खजिनदार प्रतिभा चांदुरकर यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. यावेळी यशवंतराव चव्हाण सेंटर, ठाणेचे उपाध्यक्ष सुप्रसिद्ध कवी डॉ.महेश केळुसकर, खजिनदार नारायण जवकर आदींसह अनेक मान्यवरांनी हजेरी लावली.