कोटामध्ये विद्यार्थी का करत आहेत आत्महत्या?

    28-Aug-2023
Total Views |
Another NEET aspirant dies by suicide in Kota

नवी दिल्ली : कोटा येथे दि. २७ ऑगस्ट रोजी पुन्हा दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. कोचिंग इन्स्टिट्यूटकडून घेतल्या जाणाऱ्या चाचण्यांमध्ये त्याचा नंबर सतत कमी येत होता. ह्या नंबर गेममुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागतो आणि अनेकांना या भीतीमुळे आपले जीवन संपवावे लागते.

आपल्या देशात म्हणजेच भारतात आईवडील आपले संपूर्ण आयुष्य पैसे गोळा करण्यात घालवतात. त्यांची इच्छा असते की, ज्या सुविधा आम्हाला मिळू शकल्या नाहीत, त्या मुलांना मिळाव्यात. यात गैर असं काही नाही. पंरतू यामुळे लहान वयात मुलांच्या डोक्यावर अपेक्षांच ओझ वाढत जात.

हे सगळ सुरू असताना मुलाला अनेक वेळा एकच गोष्ट गोष्ट वेगवेगळ्या प्रकारे दहा वेळा सांगितली जाते. पालक म्हणतात की, आमच्याकाळी फार सुविधा नव्हत्या. आयआयटी म्हणजे काय आणि वैद्यकीय परीक्षा काय हे आमच्या पालकांनाही माहीत नव्हते. तुला सर्व काही माहित आहे. म्हणून जे आम्ही करू शकलो नाही ते तुम्ही करा. निदान आमचे स्वप्न पूर्ण करा. आणि यात जर तुम्ही यशस्वी झालात तर आम्हाला वाटेल की आम्हाला स्वर्ग प्राप्त झाला. मुलांना ही गोष्ट वेगवेगळ्या उदाहरणांसह इतक्या वेळा सांगितली जाते की त्यांना परिक्षेत पहिला नंबर येणं मह्त्त्वाचं वाटू लागत. त्यामुळे मुलांवर मानसिक दडपण येते.

पालकांच्या दबावाखाली, मूल आपल्या भावना, ऊर्जा आणि स्वारस्य देखील दाबून टाकते आणि आपल्या पालकांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी त्या दिशेने विचार करू लागतात.आई-वडील आपली अधुरी स्वप्ने पूर्ण करण्यात इतके व्यस्त असतात की या व्यस्ततेत ते मुलांना विचारायचेच विसरतात, की तुला काय करायचे आहे?

कथा पुन्हा-पुन्हा ऐकल्यानंतर मुलांनाही असे वाटते की आयुष्य म्हणजे त्यांच्या पालकांची स्वप्ने पूर्ण करणे. त्यांचे स्वतःचे विचार, स्वप्ने, स्वारस्य आणि शक्ती इमोशनल ब्लॅकमेल नावाच्या मध्यम कुटुंबाच्या पिंजऱ्यात कैद आहेत. म्हणायला वाईट वाटेल. पण हे सत्य आहे. शिकत असताना आकड्यांच्या शर्यतीत अडकलेली मुल मोठी नोकरी मिळाल्यावर दुसऱ्या नंबरच्या खेळात अडकते. मग त्याला आयुष्यात कधीच ब्रेक मिळत नाही.


शेवटी, या नंबर गेममध्ये अडकून मूल म्हातार्‍या आई-वडिलांची काठी बनू शकत नाही, हे कुणीतरी समजून घ्यायला हवे. त्याला होळी-दिवाळीलाही सुट्टी मिळू शकत नाही. आई बाबांच्या अंत्यसंस्कारालाही तो येऊ शकत नाहीत. आई-वडीलांपैकी कोणाचा मृत्यू झाला. तर आजूबाजूच्या लोकांना सर्व उरकून घ्याला मुल सांगतात. कारण स्पर्धेच्या युगात आईवडीलांनी त्यांना अविरत धावायला शिकवलेले असते. त्यामुळे पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या या नंबर गेमचा अर्थ काय? आणि त्यातून काय मिळते, ह्यांचा आपण विचार करायला हवे.

एकंदरीत यात दोष आत्महत्या करणाऱ्या मुलाचा नाही तर आपल्या अपुर्ण स्वप्नांचे ओझे मुलांवर टाकणाऱ्या त्यांच्या पालकांचा आहे. जोपर्यंत ही परंपरा, ही विचारसरणी थांबत नाही, तोपर्यंत कोटामधील चौथ्या-सहाव्या मजल्यावरून मुले उडी मारत राहतील. आणि राहिला प्रश्न कोचिंग क्लासेसचा तर ते पैसे कमविण्याचे मशीन आहेत. त्यामुळे कुणाच्या मृत्यूची किंवा वियोगाची वेदना यंत्राला जाणवत नाही,त्याचप्रमाणे त्यांना ही फरक पडणार नाही.