उद्धव ठाकरेंनी मदत मागण्यासाठी आलेल्या मराठी उद्योजकांना हाकलून दिले - प्रवीण दरेकर

नितीन देसाई यांच्या आत्महत्येचे राजकीय भांडवल करणाऱ्या राऊतांना प्रवीण दरेकरांनी सुनावलं

    27-Aug-2023
Total Views |
 pravin darekar
 
मुंबई : कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी कर्जदारांच्या जाचाला कंटाळून २ ऑगस्ट रोजी आपल्या कर्जत स्थित स्टुडिओमध्ये आत्महत्या केली होती. त्यांच्या आत्महत्येनंतर विरोधकांनी राजकारण करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या आत्महत्येला सरकारला जबाबदार ठरवण्याचा प्रयत्न उबाठा गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी केला होता. त्याला आमदार प्रवीण दरेकर यांनी प्रतिउत्तर दिले आहे.
 
आमदार प्रवीण दरेकर यांनी एक व्हीडिओ जाहीर करत उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. नितीन देसाई यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे मदत मागायला गेले होते. पण उद्धव ठाकरे यांनी त्यांची कोणतीही मदत केली नाही. असा दावा प्रवीण दरेकर यांनी केला आहे.
 
प्रवीण दरेकर म्हणाले की, "नितीन देसाई हे उद्धव ठाकरे यांच्याकडे मदत मागण्यासाठी गेले होते ही माझ्याकडे खात्रीलायक माहिती आहे. त्यामुळे संजय राऊत मृत्यूचे जे भांडवल करत आहेत, राजकारण करत आहेत त्यांना माझा सवाल आहे हे खरे आहे की नाही याचे उत्तर द्या आणि अनेक मराठी उद्योजक जे उद्धव ठाकरे यांच्या दरवाजात जाऊन आपण त्यांना हाकलून दिले, मदत केली नाही याची यादीही मी जाहीर करणार आहे."