मुंबई : मुंबईतील सांताक्रूझ येथील गॅलेक्सी हॉटेलला भीषण आग लागली असून आग लागण्याची घटना दुपारी एक वाजता घडली. दरम्यान, सध्या आग आटोक्यात आणण्यात आली आहे. या भीषण आग दुर्घटनेत आतापर्यंत ३ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ५ जण जखमी झाले आहेत. अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी हजर असून हॉटेल रिकामे करण्याचा प्रयत्न करत आहेत.
दरम्यान, मुंबईतील सांताक्रूझ येथील गॅलेक्सी हॉटेलला भीषण आगीच्या घटनास्थळाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. हॉटेल गॅलेक्सीच्या बाहेर अनेक फायर इंजिन्स उपस्थित असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. हॉटेलला लागलेल्या आगीचे कारण अद्याप समोर आलेले नाही. मिळालेल्या माहितीनुसार, लोकांना हॉटेलमध्ये आग लागल्याची माहिती मिळताच तेथे चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली. लोक इकडे तिकडे वेगाने धावू लागले. अलार्म वाजवून हॉटेल तातडीने रिकामे करण्यात आले.