'चांद्रयान ३' ने यशस्वी लँडीग केल्यावर पाकिस्तानचे पराराष्ट्र मंत्रालय म्हणत...
26-Aug-2023
Total Views |
नवी दिल्ली : भारताच्या चांद्रयान ३ ने दि. २३ ऑगस्ट रोजी यशस्वी रित्या चंद्रवर पाऊल ठेवले. त्यानंतर जगभरातून भारताच्या यशस्वी चांद्रयान मोहिमेवर कौतुकाचा वर्षाव झाला. दरम्यान पाकिस्तानात ही भारताच्या या यशस्वी मोहिमेचे कौतुक करण्यात आले होते. मात्र अधिकृत भूमिका पाकिस्तानने घेतलेली नव्हती. पण आता पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मुमताज जहरा यांनी भारताचे आणि इस्रोच्या वैज्ञानिकांचे कौतुक केले आहे.
प्रवक्त्या मुमताज जहरा म्हणाल्या की, “मी एवढच म्हणेन की, हे मोठं वैज्ञानिक यश आहे. यासाठी इस्रोचे वैज्ञानिक कौतुकास पात्र आहेत”. त्यामुळे पाकिस्तानच्या या अधिकृत भुमिकेमुळे अनेकांना आश्चर्चयांचा धक्का बसला आहे. कारण याआधी पाकिस्तानचे माजी विज्ञान मंत्री फवाद हुसैन चौधरी यांनी भारताचे चांद्रयान २ फसल्यानंतर भारताची खिल्ली उडवली होती. मात्र ह्यावेळी त्यांनी ही इस्रोला शुभेच्छा देताना म्हटलं की, ‘इस्रोसाठी हा ऐतिहासिक क्षण आहे’
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चंद्रावरील ज्या जागेवर चांद्रयान २ ने पावलांचे ठसे सोडले त्याला आता 'तिरंगा' आणि चांद्रयान ३ च्या लँडिंग पॉइंटला 'शिवशक्ती पॉइंट' असे नाव दिले आहे. ते ग्रीस दौऱ्यानंतर इस्रोच्या कमांड सेंटरमध्ये पोहोचले आहेत.