भारतीय वेशभूषेची ताकद! इस्रोच्या महिला वैज्ञानिकांकडून 'शिक्षण आणि संस्कृतीचा मिलाफ...'
26-Aug-2023
Total Views |
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दि.२६ ऑगस्ट रोजी चांद्रयान-३ प्रकल्पात सहभागी असलेल्या भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) महिला शास्त्रज्ञांची भेट घेतली. यावेळी पंतप्रधान मोदींनी भारताच्या ऐतिहासिक चंद्र मोहिमेच्या यशात या महिला शास्त्रज्ञांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेचे कौतुक केले.
२३ ऑगस्ट रोजी भारताच्या चांद्रयान-३ ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग केले. यासह, चंद्राच्या या भागात सॉफ्ट लँडिंग करणारा भारत हा जगातील पहिला देश बनला आहे. भारताच्या या यशात विशेषत: महिला शास्त्रज्ञांनी महत्त्वाची भूमिका बजावली. दुसरीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदी शास्त्रज्ञांचे अभिनंदन करण्यासाठी परदेश दौऱ्यावरून थेट बेंगळुरूला पोहोचल्यानंतर शनिवारी इस्रोमध्ये पोहोचले.
शास्त्रज्ञांना संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी सर्व शास्त्रज्ञांच्या कामगिरीचे कौतुक केले. त्याचवेळी, आपले भाषण संपल्यानंतर पंतप्रधान मोदी महिला वैज्ञानिकांमध्ये पोहोचले आणि त्यांना हात जोडून अभिवादन केले. पीएम मोदींनी त्यांच्याशी थोडा वेळ चर्चा केली, त्यानंतर सर्व महिला वैज्ञानिकांसोबत फोटो सेशन केले. ज्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये सर्व महिला वैज्ञानिक साडीत दिसत आहेत.
त्याचवेळी सोशल मीडियावर पुन्हा एकदा साडी ट्रेंड होत आहे. साडीला मागास म्हणणाऱ्या डाव्या विचारसरणीसह सर्वांनाच ह्या साडी घातलेल्या महिला शास्त्रज्ञ आरसा दाखवत आहेत. मात्र, चांद्रयान-३ चंद्राच्या पृष्ठभागावर उतरल्याच्या दिवसापासून ही साडी ट्रेडमध्येच आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेने पीएम मोदींच्या महिला वैज्ञानिकांसोबतच्या भेटीचा व्हिडिओ जारी केला आहे. ज्यामध्ये पीएम मोदींच्या स्तुतीनंतर इस्रोच्या महिला वैज्ञानिकांमध्ये आनंदाचे वातावरण असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचवेळी, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, साडी ट्रेंडमध्ये आहे. लोक साडीचा जोरदार प्रचार करत आहेत. त्याचबरोबर बुरख्याला पुरोगामी आणि साडीला मागास म्हणणाऱ्या सर्वांवर लोक ताशेरे ओढत आहेत.