मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जपान दौरा आटोपून आज (२६ ऑग.) मायदेशात परतणार आहेत. दुपारी २.०० वा. ते मुंबईत येतील. फडणवीसांनी आपल्या दौऱ्याच्या अखेरच्या दिवशी सोनी, डेलॉईट आणि सुमिटोमो कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकार्यांच्या भेटी घेत आणि त्यांच्यासोबत सहकार्य करण्यास महाराष्ट्र इच्छूक असल्याचे म्हटले. सोनी समूहाला फिल्मसिटीत येण्याचे तसेच आयआयटी मुंबईशी संशोधनाच्या क्षेत्रात सहकार्य करण्याची विनंती त्यांनी केली, तर बांधकाम क्षेत्रात काम करणार्या सुमिटोमोला मुंबई ट्रान्सहार्बर लिंकमुळे तयार होणार्या तिसर्या मुंबईत असलेल्या संधींची माहिती दिली. आपल्या पाच दिवसांच्या धावपळीच्या दौऱ्यात फडणवीसांनी केलेल्या कामामुळे हा दौरा यशस्वीरीत्या संपन्न झाला आहे.