मुंबई : ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची काल घोषणा झाली. यात २०२१ साली आलेल्या 'मिमी' चित्रपटानेही विविध कॅटेगरीत पुरस्कार पटकावले. मुख्य अभिनेत्री क्रिती सेननने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळवला असून अभिनेते पंकज त्रिपाठी यांना सहायक अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आहे. मात्र, काही दिवसांपुर्वीच पंकज त्रिपाठी यांच्या वडिलांचे निधन झाल्यामुळे राष्ट्रीय पुरस्कारावर नाव कोरुनही पंकज आठवणीत भावूक झाले आहेत.
पंकज त्रिपाठी यांच्या वडीलांचे ९८ व्या वर्षी निधन झालं. त्यानंतर राष्ट्रीय पुरस्कार पटकावल्यानंतर अभिनेता म्हणाला, 'ही वेळ माझ्यासाठी फार दुर्दैवी आहे. आज बाबूजी असते तर खूप खूश झाले असते. मला पहिल्यांदा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला तेव्हा त्यांना खूप अभिमान वाटला होता. हा राष्ट्रीय पुरस्कार मी त्यांना समर्पित करतो. मी आज जो काही आहे त्यांच्यामुळेच आहे.' ते पुढे म्हणाले की,'या क्षणी माझ्याजवळ बोलायला शब्दच नाही आहेत. पण मी चित्रपटाच्या इतर कलाकार आणि टीमसाठी खूप आनंदी असून त्यांचा आभारी आहे. क्रितीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला त्यामुळे तिचंही खूप खूप अभिनंदन.'
६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा!
◾️सर्वोत्कृष्ट हिंदी सिनेमा- सरदार उधम
◾️सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा-एकदा काय झालं
◾️सर्वोत्कृष्ट स्टंट कोरिओग्राफी-आरआरआर- तेलुगू
◾️सर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्ट्स- आरआरआर-तेलुगू
◾️सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन- पुष्पा १
◾️सर्वोत्कृष्ट एडिटर- गंगूबाई काठियावाडी- संजय लिला भन्साली
◾️सर्वोत्कृष्ट संवाद लेखक- गंगूबाई काठियावाडी
◾️सर्वोत्कृष्ट गायिका- श्रेया घोषाल
◾️सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री- पल्लवी जोशी (द कश्मीर फाइल्स)
◾️सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- आलिया भट्ट ( गंगूबाई काठियावाडी) आणि क्रिती सेनन (मीमी)
◾️सर्वोत्कृष्ट अभिनेता- पुष्पा- अल्लू अर्जून
◾️सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन- निखिल महाजन ( गोदावरी )
◾️सर्वोत्कृष्ट चित्रपट- 'रॉकेट्री: द नांबी इफेक्ट'