चंद्रयानचे उड्डाण हे भारतीय विकासात्मक यशाचे द्योतक - एन चंद्रशेखरन

    25-Aug-2023
Total Views |
N Chandrashekharan
 
  
 
चंद्रयान उड्डाण हे भारतीय विकासात्मक यशाचे द्योतक -  एन चंद्रशेखरन
 
 
  
नवी दिल्ली :   २५ ऑगस्टला नवी दिल्लीत झालेल्या B २० तीन दिवसीय समिटमध्ये बोलताना टाटा सन्स चे चेअरमन एन चंद्रशेखरन यांनी भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी ते सकारात्मक असल्याचे सांगितले.  यावेळी बोलताना त्यांनी सरकारच्या पीएम गतीशक्ति योजना, प्रोडक्ट लिंक इन्सेंटीव्ह, लो कॉर्पोरेट टॅक्स, शिवाय स्टार्ट अप आणि डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर या महत्वाकांक्षी योजनांचा उल्लेख त्यांनी यावेळी केला.
 
 
 चंद्रयान ३ चा यशस्वी उड्डाणाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी  Indian Space Research Organisation (ISRO) चे विशेष कौतुक केले. याविषयी बोलताना ' हे उड्डाण भारताच्या यशाचे द्योतक असून आपण भविष्यातही मोठे यश प्रदान करु शकतो ' असे त्यांनी सांगितले.
 
 
 डिजिटल, एनर्जी, ग्लोबल व्हॅल्यु सप्लाय चेन या विषयावर जगभरात स्थित्यंतरे होत आहेत. यामध्ये भारत आघाडीवर आहे. याशिवाय सगळ्या ११० धोरणे यशस्वी पातळीवर सत्यात उतरतानाच आम्ही MSME साठी अर्थसहाय्य करण्यात यावे असे सुचवले आहे.' असे ते म्हणाले.