‘क्रिप्टो’साठी सर्वांत मोठा ग्राहक आधार असलेलीअमेरिका सध्या ‘क्रिप्टो ऑपरेशन्सवर सिक्युरिटीज अॅण्ड एक्स्चेंज कमिशन’ (एसईसी)च्या अथक कारवाईमुळे अनिश्चिततेशी झुंजत आहे. यामुळे नियामक घडामोडी, स्वीकारण्याचे वातावरण आणि व्हर्च्युअल डिजिटल मालमत्तेसाठी रोखीत रूपांतर करण्याची सुलभता प्रदान करण्यात वित्तीय संस्थांकडून मिळालेल्या मदतीच्या प्रगतीत लक्षणीयरित्या अडथळा निर्माण झाला आहे. तथापि, फिट कायद्याच्या रूपात क्षितिजावर एक आशेचा किरण आहे. ज्याचा उद्देश अमेरिकेला ज्यांनी ‘क्रिप्टो’नियमांची अंमलबजावणी केली आहे, अशा इतर राष्ट्रांच्याबरोबरीने आणणे आहे.
‘एसईसी कमोडिटी फ्यूचर्स ट्रेडिंग कमिशन’ (सीएफटीसी) मधील उद्योगाच्या देखरेखीसाठी सीमा स्पष्टपणे परिभाषित करणे आणि भागधारकांसाठी निर्णयामध्ये फरक किंवा अनिश्चितता निर्माण करणारी कोणतीही अस्पष्टता दूर करणे, हे या विधेयकाचे प्राथमिक उद्दिष्ट आहे.‘क्रिप्टो’ उद्योगावर ‘एसईसी’च्या अधिकाराच्या चालू असलेल्या प्रयोगादरम्यान, रिपलच्या निर्णयाने समुदायामध्ये आशा निर्माण केली आहे. या अशा प्रकारच्या पहिल्याच सकारात्मक निर्णयामुळे खटल्यांच्या अतिरिक्त छाननीसाठी अपेक्षा वाढल्या आहेत आणि भविष्यात अधिक अनुकूल निकाल येण्याची शक्यता वाढली आहे. या विधेयकाने, या विषयावर प्रथमच काँग्रेसचे मत दर्शविल्याने, इकोसिस्टमच्या आशा आणखी वाढल्या आहेत.
‘क्रिप्टो’ प्रकल्पांद्वारे जारी केलेले टोकन पारंपरिक सिक्युरिटीजपासून वेगळे करणे हे एक महत्त्वपूर्ण पाऊल होते. कारण, अमेरिकेमधील संस्था, जसे की प्रमुख एक्सचेंजेस, ते नोंदणीकृत नसलेल्या सिक्युरिटीज जारी करत असल्याचा आरोप करत ‘सिक्युरिटीज अॅण्ड एक्सचेंज कमिशन’च्या नियामक दबावाखाली होते.‘वेब3’ची मूलभूत तत्त्वे स्वीकारून, विधेयकाने अशा तत्त्वांचा दावा करणार्या प्रकल्पांसाठी विकेंद्रीकरणाची आवश्यक मानके स्थापित केली आहेत. हे महत्त्वपूर्ण पाऊल याची हमी देईल की, केंद्रीकृत ‘क्रिप्टो’ प्रकल्प केवळ परिभाषित कायदेशीर मापदंडांमध्येच कार्य करू शकतील, प्रकल्प संस्थापकांचे अयोग्य नियंत्रण काढून टाकतील.
या विधेयकाने विचारात घेतलेला आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे ‘क्रिप्टो’द्वारे बेकायदेशीर वित्तपुरवठा बंद करणे आणि निर्बंध टाळण्यासाठी डिजिटल मालमत्ता वापरून वाईट कृती करणार्यांना दूर करणे. या विधेयकात वापरकर्त्यांच्या संरक्षणाच्या पैलूंचाही विचार करण्यात आला आहे. या विधेयकाचा एक महत्त्वाचा पैलू म्हणजे ‘क्रिप्टो’च्या बाजूने असलेले अग्रणी, इकोसिस्टम तज्ज्ञ आणि नियामक यांच्यातील सातत्यपूर्ण संवाद. यामुळे कायद्याच्या निर्मात्यांना आभासी डिजिटल मालमत्तेचे वेगाने विकसित होणारे स्वरूप त्यांच्या वर्गीकरणावर कसा परिणाम करते आणि ‘ट्रॅडएफआय’ आणि ‘डीईएफआय’साठी समान नियम भागधारकांच्या हितासाठी कसे कार्य करणार नाहीत हे समजून घेण्यात मदत झाली. याचा आनंद साजरा करणे अद्याप उतावीळपणाचे ठरेल. कारण, औपचारिकरित्या स्वीकारण्यापूर्वी विधेयकाला आणखी पुनरावलोकने घेणे आवश्यक आहे.
-राजगोपाल मेनन
(लेखक ‘वझीरएक्स’चे उपाध्यक्ष आहेत.)