सावधान! मुंबईत झिका विषाणूचा शिरकाव

अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांचे मुंबईकरांना आवाहन

    24-Aug-2023
Total Views | 376

Zika virus


मुंबई :
झिका आजाराचा एक ७९ वर्षीय रूग्ण एम पश्चिम विभागाच्या चेंबूर येथे आढळून आला होता. ताप, सर्दी आणि खोकला अशी लक्षणे होती. सदर रूग्णाने खाजगी वैद्यकीय उपचार घेतले. झिका आजारावर उपचार देऊन या रूग्णाला घरी सोडण्यात आले. या रूग्णाला १९ जुलै पासून मधुमेह, उच्च रक्तदाब, खोकला, ह्दयरोग, थॅलेसेमिया अशी लक्षणे होती. मुंबईत झिका व्हायरसचा आढळलेला हा पहिला रूग्ण आहे. राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (पुणे) यांनी सदर रूग्णाबाबतची माहिती दिली होती.
 
झिका रोग हा झिका विषाणूच्या संसर्गामुळे होणारा सौम्य आजार आहे. झिकाचा संसर्ग हा एडिस डासांमुळे पसरतो. एडिस डास डेंग्यू आणि चिकुन गुनिया यासारख्या आजारांचाही प्रसार करतात. विषाणूजन्य आजार असला तरीही या आजाराचा संसर्ग आणि संक्रमण कोविडसारख्या आजाराच्या वेगाने होत नाही.
 
लक्षणे
 
- ताप, त्वचेवर पुरळ, डोळे येणे, स्नायू आणि सांधेदुखी, अस्वस्थता आणि डोकेदुखी
- झिका हा एक स्वयं – मर्यादित आजार आहे. झिका विषाणूची लागण झालेल्या व्यक्तींपैकी ८० टक्के व्यक्तींमध्ये लक्षणे नसतात.
- या आजाराच्या चाचणीची सुविधा बृहन्मुंबई महानगरपालिकेत के ई एम रूग्णालयात उपलब्ध आहे.
  
कार्यवाहीचा अहवाल
 
- बाधित रूग्णाच्या परिसरातील घरांचे सर्वेक्षण केले आहे. त्यामध्ये कोणताही नवीन संशयित रूग्ण आढळला नाही.
- इमारतीच्या पार्किंगमध्ये आढळणारी एडीस डास उत्पत्ती आणि डास नियंत्रण उपाययोजना केल्या जातात.
 
नागरिकांना आवाहन 
 
- नागरिकांनी घाबरून जाऊ नये
- डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी सर्व पाण्याच्या टाक्या आणि कंटेनर घट्ट झाकणांनी झाकून ठेवा.
- वापरात नसलेले सर्व कंटेनर, जंक मटेरियल, टायर, नारळाची करवंटी आदींची विल्हेवाट लावा.
- साप्ताहिक कोरडा दिवस साजरा करा. आठवडाभर पाणी असणारे सर्व कंटेनर, फुलदाणी आदी रिकामे करा.
 
वैयक्तिक संरक्षणासाठी
 
- झिका विषाणूचा प्रसार करणाऱ्या डासांचा प्रतिबंध करण्यासाठी बेड नेटचा वापर करा
- दिवसा डासांपासून बचावासाठी पूर्ण अंग झाकणारे कपडे वापरा
- डास प्रतिबंधात्मक बॉडी जेलचा वापर करा
अग्रलेख
जरुर वाचा
भारतीय जनता पार्टी द्वारे शासकीय दाखले शिबिर संपन्न

भारतीय जनता पार्टी द्वारे शासकीय दाखले शिबिर संपन्न

वसई विरार शहर महापालिका क्षेत्रातील दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना विविध शासकीय दाखल्यांची अत्यंत गरज भासत असते. त्यासाठी त्यांना व त्यांच्या पालकांना शासकीय कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात. वसई तहसीलदार ऑफिसला जाणे गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शक्य होत नसल्याने ही गैरसोय टाळण्यासाठी भारतीय जनता पक्षाद्वारे वसई तहसील कार्यालयाकडील उत्पन्न दाखले, अधिवास दाखले, क्रिमिलेअर दाखले, ज्येष्ठ नागरिक दाखले, रेशन कार्ड ऑनलाइन करून घेणे अशा विविध कामकाजाचे शिबिर शनिवार १४ जून रोजी कातकरीपाडा, चंदनसार..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121