चांद्रयानाचे सॉफ्ट लँडिंग असलेल्या भागातील तापमान माहीत आहे का, जाणून घ्या

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील -२१७ अंश सेल्सियसच्या वातावरणात लँडिंग होणार

    23-Aug-2023
Total Views |
Indian Space Research Organization Landing Spot Temprature

नवी दिल्ली :
भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात (इस्त्रो) नवा इतिहास घडविणार असून चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरविण्याचा विक्रम भारत आपल्या नावावर करणार आहे. हा क्षण देशातील १३० कोटी जनतेसाठी अभिमानाचा असणार आहे. यशस्वी लँडिंगसाठी देशभरातून प्रार्थना आणि इस्त्रोला पाठबळ देण्यात समस्त भारत देश गुंतला आहे.

परंतु, आजही एकाही देशाला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरविता आले नाही. यात नासापासून ते अगदी युरोपीय स्पेस एजन्सीपर्यंत सगळ्यांचे प्रयत्न फसले आहेत. त्याला कारण ही तसेच आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील -२१७ अंश सेल्सियस इतके प्रचंड कमी तापमान आहे. परंतु, भारताने चांद्रयान मोहिम आखत चंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास करण्यासाठी कंबर कसली. आणि त्यामाध्यमातून सॉफ्ट लँडिंग करण्यासाठी सज्ज झाला आहे.

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील -२१७ अंश सेल्सियस वातावरणात सॉफ्ट लँडिंग करणे तितकेसे सोपे काम नाही, परंतु. यावर इस्त्रोने तोडगा काढला असून चंद्राच्या पृष्ठभागावर सुर्याची किरणे पोहोचून तापमानात वाढ होईपर्यंत वाट पाहण्यात येणार आहे. त्यामुळे भारताने चांद्रयान मोहिमेसाठी महिन्याभराहून अधिक वेळ दिला आहे. इस्त्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी एक याबाबत स्पष्टता केली आहे. ते म्हणाले, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील -२१७ अंश सेल्सियस तापमान लक्षात घेता सुर्याच्या किरणांचा प्रवेश ज्यावेळी याभागात होईल तेव्हाच लँडिंग करणे सोपे जाईल. कारण इतक्या कमी तापमानात लँडरला धोका पोहोचण्याचा शक्यता असू शकते. त्यामुळे दि. २३ ऑगस्ट रोजी लँडिंग करणे शक्य झाले नाहीतर दि. २६ ते २७ ऑगस्ट २०२३ दरम्यान सॉफ्ट लँडिंगचा प्रयत्न केला जाणार आहे.