आज दागिने खरेदी करताय ? मग हे वाचा
सोने ९०, चांदी ८०० रुपयांनी महागली
पीटीआय: एचडीएफसी सिक्युरिटीजने दिलेल्या माहितीनुसार,जागतिक बाजारात सोन्याच्या दरात वाढ झाल्याने बुधवारी राष्ट्रीय राजधानी दिल्लीत सोन्याचा भाव 90 रुपयांनी वधारून 59,500 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. मागील सत्रात सोन्याचा भाव 59,410 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. चांदीही ८०० रुपयांनी वधारून ७५,३०० रुपये प्रति किलोग्रॅम झाली.
एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) सौमिल गांधी म्हणाले की, ' परदेशी बाजारातून सकारात्मक संकेत मिळाल्याने बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी सोने वधारले आणि दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचे स्पॉट दर 90 रुपयांनी वाढून 59,500 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले.' असे म्हणाले.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीचे दर अनुक्रमे 1,903 डॉलर प्रति पौंड आणि 23.75 डॉलर प्रति पौंड झाले आहेत.
मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष (कमोडिटी रिसर्च) नवनीत दमानी यांनी सांगितले की, अमेरिकन डॉलर आणि ट्रेझरी यील्डमध्ये किंचित घसरण झाल्याने सोने आणि चांदीमध्ये तेजी कायम आहे'.