मुंबई : राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्था (NIELIT) अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती सुरू आहे. ‘कर्मचारी-कार चालक’ पदांच्या एकूण ०९ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ ऑगस्ट २०२३ आहे.
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय किमान १८ वर्षे आणि कमाल ४० वर्षे असावे. तसेच, एससी/एसटी/ओबीसी/पीडब्ल्यूडी/पीएच श्रेणीतील उमेदवारांनाही सरकारी नियमांनुसार वयात काही सूट मिळेल. उत्तीर्ण उमेदवारांना वेतन दरमहा १९,९०० ते ६३,२०० रुपये पगार मिळेल. तसेच, भरतीविषयी अधिक माहितीसाठी https://nielit.gov.in/ ला भेट द्या.
NIELIT रेवाडीमध्ये स्टाफ कार ड्रायव्हर पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले असून इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करावा लागेल, तसेच, त्यांची कंत्राटी पद्धतीने भरती केली जाईल. या पदासाठी पुरुष आणि महिला अर्जदार अर्ज करू शकतात. तुम्ही अधिकृत वेबसाइटवरही या पदांसाठी अर्ज करू शकता. सध्या ही भरती एका वर्षासाठी केली जात असली तरी नोकरीच्या समाधानानुसार दरवर्षी ती वाढवता येते.