१० वी पास आणि ITI उमेदवारांना नौदलात नोकरीची सुवर्णसंधी

    21-Aug-2023
Total Views |
Indian navy recruitment 2023

मुंबई :
भारतीय नौदल विभागात १० वी पास आणि आयटीआय उमेदवारांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी मिळणार आहे. दरम्यान, भारतीय नौदलात ‘या’ पदासाठी लवकरच भरती सुरु होणार आहे. भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण आणि ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

दरम्यान, भारतीय नौदल हेड क्वार्टर अंदमान आणि निकोबार कमांड अंतर्गत ट्रेड्समन मेट पदांसाठी भरती केली जाणार आहे. एकूण ३६२ रिक्त जागांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. भरतीसाठी पात्र उमेदवार अर्ज करू शकतात. नोकरी ठिकाण हे अंदमान आणि निकोबार/ संपूर्ण भारत असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ सप्टेंबर २०२३ आहे. तर अधिकृत बेवसाईट https://www.andaman.gov.in भेट द्या.

नौदलाच्या ट्रेड्समन मेट पदाकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. शैक्षणिक पात्रता – १० वी पास किंवा संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे. तसेच, सदर भरतीसाठी वयोमर्यादा खुल्या प्रवर्गासाठी १८ ते२५ वर्षे असून ओबीसी प्रवर्गासाठी ३ वर्षांची तर मागासवर्गीयांसाठी ५ वर्षांची सूट देण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही.