भाभा अणू संशोधन केंद्र मुंबई येथे फेलोशिपची संधी; आजच अर्ज करा

    21-Aug-2023
Total Views |
BARC Mumbai Bharti 2023

मुंबई :
BARC अर्थात ज्याला भाभा अणुसंशोधन केंद्र म्हणूनही ओळखले जाते, येथे काम करण्याची संधी मिळणार आहे. इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. दरम्यान, भाभा अणुसंशोधन केंद्र, मुंबई या भौतिक, रसायन आणि जीवन विज्ञान या क्षेत्रातील “ज्युनियर रिसर्च फेलोशिप्स” साठी जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. याकरिता अंतिम मुदत दि. ३१ ऑगस्ट २०२३ असणार आहे.

दरम्यान, भरतीसाठी पात्रता निकष पूर्ण करणार्‍या इच्छुक उमेदवारांना अधिकृत वेबसाइट www.barc.gov.in द्वारे त्यांचे अर्ज ऑफलाइन सबमिट करायचा असून BARC मुंबई भर्ती मंडळाकडून जुलै २०२३ साठी अलीकडील जाहिरातीत एकूण १०५ रिक्त पदांचे अनावरण केले आहे. यात पदाचे नाव कनिष्ठ संशोधक फेलोशिप असून शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.

तसेच, उमेदवाराची वय अर्ज स्वीकृतीच्या शेवटच्या तारखेपर्यंत २८ वर्षांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. एससी/एसटी: ५ वर्षांची वयाची सूट, ओबीसी: ३ वर्षांची वयाची सूट असणार आहे. तर उमेदवाराकडून ५०० रुपये अर्ज शुल्क आकारण्यात येणार आहे. नोकरीचे ठिकाण मुंबई राहणार असून याकरिता मागासवर्गीय उमेदवाराकडून कुठलेही शुल्क आकारण्यात येणार नाही. दरम्यान, या फेलोशिपच्या संधीसाठी बार्कच्या अधिकृत वेबसाईट https://www.barc.gov.in/ ला भेट द्या.