वसई : आम्ही सारे, वसई आणि अण्णासाहेब वर्तक महाविद्यालय यांच्या वतीने कै . निरज जड स्मृती प्रित्यर्थ एकपात्री अभिनय आणि नाटुकली स्पर्धेचे आयोजन दि . २० ऑगस्ट रोजी करण्यात आले होते. या स्पर्धेत एकपात्री अभिनयासाठी ४० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. तसेच नाटुकली स्पर्धेसाठी २३ संघानी सहभाग घेतला होता. तरी एकपात्री अभिनयात प्रथम क्रमांक सानिका देवलकर, द्वितीय क्रमांक स्नेहा प्रसाद, तृतीय क्रमांक कृपा गायकवाड हिने मिळवले. तसेच मानसी जाधव, समीक्षा पाटील, उत्तरा बोस, विजया गुंडप यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक आणि विशेष लक्षवेधी म्हणून युवराज राळे याला पारितोषिक प्रदान करण्यात आले.
तसेच नाटुकली स्पर्धेत 'जोकर्स थिएटर' यांनी प्रथम क्रमांक मिळवला. द्वितीय क्रमांक कीर्ती कॉलेज, तृतीय क्रमांक अण्णासाहेब वर्तक महाविद्यालय आणि विवा कॉलेज, सह्याद्री कॉलेज यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळवले. या स्पर्धेचे परीक्षण अभिनेते संदीप रेडकर आणि राहुल भंडारकर यांनी केले. तसेच या स्पर्धेला प्राचार्य अरविंद उबाळे,प्रा. निशिगंधा जाधव,निखिल जड या मान्यवरांनी उपस्थिती लावली.