साखर तुटवडा होईल की काय?
नवी दिल्ली: इस्माच्या(इंडियन शुगर मिल्स असोसिएशन)अंदाजानुसार आर्थिक वर्ष २३-२४ मध्ये साखरेचे उत्पादन ३.४१ टक्क्यांनी कमी होऊन ३१६.८० लाख टन होईल.इथेनॉल उत्पादनासाठी ऊसाचा अधिक वापर केल्यामुळे साखरेचे उत्पादन कमी झाले आहे. याच धर्तीवर ऑक्टोबर २०२३ पासून सुरू होणाऱ्या नव्या हंगामात देशातील साखर उत्पादन ३.४१ टक्क्यांनी कमी होऊन ३१६.८० लाख टनांवर येण्याचे भाकीत इस्माने केले आहे.२२-२३ च्या हंगामात (ऑक्टोबर ते सप्टेंबर) ३२८ लाख टन साखर उत्पादन अपेक्षित आहे.
इस्माने पुढील हंगाम 2023-24 मध्ये सुमारे 45 लाख टन साखर इथेनॉल उत्पादनासाठी वळविली जाईल,असा अंदाज व्यक्त केला आहे.
२०२३-२४ च्या हंगामात साखरेचे उत्पादन २७५ लाख टनांच्या देशांतर्गत वापरापेक्षा अधिक असण्याचा अंदाज असून,अखेरीस ४२ लाख टन साखर शिल्लक राहू शकते असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला गेला आहे.परिणामी साखरेचा तुटवडा निर्माण होऊ शकतो.