हरियाणा हिंसाचार! कट्टरपंथीयांनी केली प्रदीप कुमार यांची हत्या

    02-Aug-2023
Total Views |
Bajrang Dal
 
चंदीगड : हरियाणाच्या नूंह जिल्ह्यात सोमवारी (३१ जुलै २०२३) जलाभिषेक यात्रेवर कट्टरपंथी जमावाने हल्ला केला. या हल्ल्यात अनेक निर्दोष लोकांचा बळी गेला आहे. प्रदीप कुमारही या हिंसाचाराला बळी पडले आहेत. नल्हाड मंदिराजवळ झालेल्या हल्ल्यात प्रदीप कुमारला सुखरूप बाहेर पडले होते. पण कट्टरपंथीयांनी मंगळवारी (१ ऑगस्ट २०२३) त्यांची घरी जात असताना हत्या केली
 
ऑप इंडियाने प्रदीप कुमार यांच्यासह घटनेच्या वेळी उपस्थित कपिल कुमार त्यागी यांच्याशी चर्चा केली. या हल्ल्यात कपिल त्यागींही दुखापत झाली असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. कपिल त्यागी यांनी आम्हाला सांगितले की, त्यांची आणि प्रदीपची पोलिसांनी नल्हाड मंदिरातून सुटका केली आणि त्यांना नूंहच्या पोलीस लाईनमध्ये आणले.
 
रात्री बराच वेळ पोलीस लाईनमध्ये ठेवल्यानंतर पहाटे २ ते ३ च्या दरम्यान पोलिसांनी त्यांना गुरुग्रामपर्यंत सोडतो असे सांगून सोबत चलण्यास सांगितले. प्रदीप कपिलची स्विफ्ट डिझायर कार चालवत होते. हिंदू संघटनांशी संबंधित ३ महिलाही मागे बसल्या होत्या, त्यांना या दोघांसह आपापल्या घरी पाठवण्यात आले.
 
कपिलने आम्हाला पुढे सांगितले की त्याच्या वाहनासोबत हिंदू संघटनेशी संबंधित लोकांची एर्टिगा कार होती. या दोन वाहनांसमोर पोलिसांची जिप्सी होती. थोडे अंतर गेल्यावर सोहना परिसरात जिप्सीमध्ये उपस्थित असलेल्या पोलिसांनी हिंदू संघटनेच्या सदस्यांना सुरक्षेशिवाय पुढे जाण्यास सांगितले.
 
कपिल त्यागीचा दावा आहे की, ज्या रस्त्याने त्यांना जायचे होते तो रस्ता अगदी निर्जन होता. पोलिसांशिवाय ते थोड्याच अंतरावर गेले असता एक अनोळखी स्कॉर्पिओ त्यांच्या समोरून आली. त्यांची गाडी २ ते ३ किमी पुढे सरकली तेव्हाच रस्त्याच्या दुतर्फा मुस्लिमांची गर्दी दिसली. या गर्दीत लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सुमारे ३०० लोक उपस्थित होते. जमावाने कपिलच्या गाडीला घेराव घातला आणि दगडफेक सुरू केली. दगडफेकीत कारच्या काचा फुटल्या. मागे बसलेल्या महिलांनाही दुखापत झाली.