विरोधकांनी कितीही हातपाय मारले तरी २०२४ मध्ये भाजपाचीच सत्ता- टाईम्स नाऊच्या सर्वेत दावा

    18-Aug-2023
Total Views |
narendra-modi 
 
मुंबई : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीला एक वर्षापेक्षाही कमी काळ शिल्लक राहिला आहे. लोकसभा निवडणूकीत कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील याचा अंदाज आतापासूनच लावला जात आहे. दरम्यान, टाईम्स नाऊ ईटीजीने या वृत्तसंस्थेने २०२४ च्या निवडणूकीच्या आधी ओपिनियन पोल केला आहे. यामध्ये काही धक्कादायक आकडे समोर आले आहेत.
 
टाईम्स नाऊ नवभारतच्या सर्वेक्षणानुसार एनडीए तिसर्यां दा केंद्रात सरकार स्थापन करेल. जर टाईम्स नाऊ नवभारतचा सर्वे खरा ठरल्यास हा नव्याने होऊ घातलेल्या विरोधकांच्या आघाडीला मोठा धक्का असेल. या सर्वेनुसार २०२४ च्या लोकसभा निवडणूकीत एनडीएला २९६ ते ३२६ जागा मिळतील, असा अंदाज आहे.
 
तर या सर्वेनुसार विरोधकांच्या आघाडीला १६० जागांवर समाधान मानावे लागेल. तर देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला ८० पैकी ७० जागा मिळतील, असा दावा या सर्वेक्षणात करण्यात आला आहे. २०१९ मध्ये भाजपाला उत्तर प्रदेशमध्ये ६३ जागा मिळाल्या होत्या.
 
या सर्वे वरुन हेच लक्षात येत आहे की, देशात आणखीही पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता कमी झालेली नाही. विरोधकांकडे नरेंद्र मोदी यांना टक्कर देईल, असा नेता नाही आहे. त्यामुळेच विरोधी आघाडीला लोकसभा २०२४ च्या निवडणूकीत एनडीएचा पराभव करायचा असल्यास मोदींना टक्कर देऊ शकेल, असा नेता शोधावा लागेल.