विवाहबाह्य संबंधातील संततीस संपत्तीचा हक्क, सर्वोच्च न्यायालयाकडून निकाल राखीव
18-Aug-2023
Total Views | 157
नवी दिल्ली : हिंदू विवाह कायद्यानुसार विवाहबाह्य संबंधातून जन्मास आलेल्या संततीस आई-वडिलांच्या वडिलोपार्जित संपत्तीवर हक्क सांगता येईल की नाही, याविषयी सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी पूर्ण करून निकाल राखून ठेवला आहे.
सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्या. जे. बी. पारडीवाला आणि न्या. मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर २०११ सालापासून प्रलंबित याचिकेवरील युक्तीवाद शुक्रवारी पूर्ण केला. यावेळी न्यायालयाने हिंदू विवाह कायद्यातील कलम १६ (३) अंतर्गत विवाहबाह्य संबंधतील अपत्यांना त्यांच्या आई – वडिलांच्या स्वअर्जित संपत्तीसह वडिलोपार्जित संपत्तीवरही हक्क आहे का, याविषयी युक्तीवाद ऐकून घेतला. त्यानंतर आता न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे.
या प्रकरणास न्यायालयाने ३१ मार्च २०११ रोजी दोन सदस्यीय खंडपीठाकडे पाठविले होते, त्यानंतर या खंडपीठाने प्रकरणास तीन सदस्यीय खंडपीठाकडे पाठविले होते. विवाहबाह्य संबंधातून जन्माला आलेली मुल केवळ आई-वडिलांच्या संपत्तीवरच अधिकाराचा दावा करू शकतात, इतर संपत्तीवर नाही, असे तरतुदीतून स्पष्ट होते. या बालकांच्या त्यांच्या आई-वडिलांच्या वडिलोपार्जित संपत्तीवर कुठलाही अधिकार राहणार नाही, या सर्वोच्च न्यायालयाच्या यापूर्वीच्या निरीक्षणावर खंडपीठाने अहसमती दर्शवली होती.