हॅशटॅग बाप्पाच्या माध्यमातून मुंबईतील गणपतींचे दर्शन आता एका क्लिकवर

    18-Aug-2023
Total Views | 141

Hashtag Bappa


मुंबई :
मुंबईतील गणेशोत्सव म्हटला तर बाप्पाचा जयघोष आणि सार्वजनिक मंडळांची ऐट पहायला मिळते. मुंबईतील या गणेश मंडळाचे दर्शन आता एकाच क्लिकवर होऊ शकणार आहे. आपला उत्सव जागतिक दर्जावर पोहचवण्यासाठी आम्ही उचलेलं हे छोटसं पाऊल आहे. हॅशटॅग बाप्पा या संकेतस्थळाद्वारे ते शक्य होणार आहे.
 
मुंबईत चाळ संस्कृतीपासून ते टॉवरपर्यत प्रत्येकाच्या घराघरात आणि मंडळात बाप्पा विराजमान झालेले दिसून येतात. तसेच मुंबईतील मानाच्या गणपतीच्या दर्शनासाठी मोठ्याच मोठ्या रांगा लागलेल्या असतात. सार्वजनिक गणेश मंडळांची वाढती प्रसिद्धी पाहता, ह्या सर्व गणपतींचे दर्शन घेण्यासाठी दहा दिवस देखील अपुरे पडतात.
 
त्यामुळे राहून गेलेल्या तसेच घरबसल्या आपल्या आवडत्या मंडळातील गणपतीचे दर्शन घेण्यासाठी हॅशटॅग बाप्पा हे संकेतस्थळ ब्रँण्डमेकर या संस्थेच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात आले आहे. या संकेतस्थळामार्फत मुंबईतील कोणत्याही मानाच्या गणपतीचे एका क्लिकवर लाईव्ह दर्शन घेणे आता शक्य होणार आहे. क्यु आर कोड स्कँन करुन किंवा एन एफ सी कार्डच्या माध्यमातून मुंबईतील कोणत्याही गणपती मंडळाची सविस्तर माहिती, मंडळाच्या उपक्रमांचा आढावा तसेच थेट प्रक्षेपण घेवू शकता.


अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121