पीएम इ बस सेवा योजनेला कॅबिनेट बैठकीत मंजूरी- अनुराग ठाकूर

    18-Aug-2023
Total Views | 22
E Bus
 
 
 
पीएम इ बस सेवा योजनेला कॅबिनेट बैठकीत मंजूरी-  अनुराग ठाकूर
 
 

नवी दिल्ली:   मोदी सरकारच्या कॅबिनेट बैठकीनंतर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना पी एम बस सेवा योजना लागु करणार असल्याचे सांगितले आहे.  ५७६१३ कोटी रुपये या योजनेवर खर्च होणार आहेत. दिमतीला १०००० नवीन इलेक्ट्रिक बस जनतेच्या सेवेस हजर असतील.
 
 
या योजनेला सरकारकडून मान्यता मिळाली असल्याचे अनुराग ठाकूर यांनी स्पष्ट केले. या ५७६१३ कोटींचा बजेटमधून २०००० कोटी केंद्र सरकार देणार असून राहिलेल्या पैशाची तरतूद राज्य सरकार यांनी करायची आहे.  पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप तत्वावर या इ बसेस चालवल्या जाणार आहेत.
 
 
पर्यावरणाचा दृष्टीने हितकारक आणि अत्याधुनिक इ बसेसचा वापर करून भारताचा ग्रीन गो मिशनला चालना मिळेल. विविध शहरांमध्ये ही ई बस सुविधा दळणवळणासाठी खूप उपयुक्त ठरू शकते‌.
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121