मुंबई : अभिनेता अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठी यांची प्रमुख भूमिका असलेला 'ओएमजी २' चित्रपट ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला. याच दिवशी गदर २ हा चित्रपट देखील प्रदर्शित झाल्यामुळे ओएमजी २ चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाई करेल का? किंवा 'गदर २' समोर तग धरेल का असा प्रश्न निर्माण झाला असताना 'ओएमजी २'ने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली आहे.
अमित राय दिग्दर्शित, 'ओएमजी २' २०१२ मध्ये अक्षय कुमार आणि परेश रावल यांच्या 'ओह माय गॉड' चा सिक्वल आहे.
'ओएमजी २' ची स्वातंत्र्यदिनी सर्वाधिक कमाई
बॉक्स ऑफिस रिपोर्ट शेअरिंग साइट Sacnilk नुसार, अक्षय कुमारच्या चित्रपटाने स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी भरघोस कमाई केली. आधीच्या आकडेवारीनुसार सोमवारपर्यंत चार दिवसांत चित्रपटाने ५५.१७ कोटी रुपयांची कमाई केली आहे, तर मंगळवारी पाचव्या दिवशी १८.५० कोटी रुपयांची कमाई केली आहे. चांगली गोष्ट म्हणजे चित्रपटाच्या कमाईत दिवसेंदिवस सातत्याने वाढ होत आहे.
पाच दिवसांत ७३.६७ कोटींची कमाई
पहिल्या दिवशी चित्रपटाने १०.२६ कोटी रुपयांची कमाई केली, तर दुसऱ्या दिवशी १५.३ कोटी रुपयांची कमाई केली. रविवारी १७.५५ कोटींनंतर सोमवारी १२.०६ कोटी रुपये आणि मंगळवारी १८.५० कोटी रुपये कमावले. एकूण पाच दिवसांत या चित्रपटाने ७३.५७ कोटींची कमाई केली आहे. चार दिवसांत चित्रपटाने परदेशात १२.५० कोटी रुपये कमावले आहेत आणि भारतात एकूण ६५ कोटी रुपये कमावले आहेत.
काय आहे कथानक?
'ओएमजी २' चित्रपटात पंकज त्रिपाठी, कांती शरण मुदगलची भूमिका साकारत आहे, त्यात त्यांचा मुलगा विवेकचा आक्षेपार्ह व्हिडिओ शाळेतून व्हायरल होतो. मुलाला शाळेतून काढून टाकले जाते. कांती शरण मुद्गल हे शिवभक्त आहेत. ते या कठिण काळात शंकराकडे मदत मागतात आणि येथूनच वडिलांचा असा लढा सुरू होतो ज्यानंतर त्यांच्या मुलाला केवळ शाळेचा सन्मानच मिळत नाही तर सर्व शाळकरी मुलांसाठी एक नवीन मार्ग देखील तयार होतो. तेही समोर आहे. या चित्रपटात अक्षय भगवान शिवाच्या दूताची भूमिका साकारत असून यामी गौतम वकिलाची भूमिका साकारत आहे.