‘द व्हॅक्सीन वॉर’च्या प्रदर्शनाची तारीख विवेक अग्निहोत्रींनी केली घोषित

    15-Aug-2023
Total Views |
 
vivek agnihotri
 
 
 
 
 
 
मुंबई : आधी 'द काश्मीर फाईल्स' आणि आता 'द काश्मिर फाईल्स अनरिपोर्टेड' या चर्चेत आलेल्या चित्रपटांनंतर दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी अजून एक मोठी घोषणा केली आहे. अग्निहोत्रींनी काही दिवसांपूर्वी 'द व्हॅक्सीन वॉर' या चित्रपटाबाबत सांगितले होते. या चित्रपटाचा ट्रेलर आज अग्निहोत्री यांनी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत प्रदर्शित केला असून त्यांनी हा चित्रपट २८ सप्टेंबर २०२३ रोजी प्रदर्शित होणार असल्याची माहितीही दिली आहे.
 
देशातील डॉक्टरांनी आणि शास्त्रज्ञांनी करोनाच्या काळात कशा पद्धतीने काम केले, कोणत्या संघर्षांचा सामना केला, त्यांनी व्हॅक्सीनची निर्मिती कशी केली याविषयीची मांडणी या चित्रपटातून कऱण्यात आली आहे. 'द व्हॅक्सीन वॉर' ही भारतातली पहिली बायो सायन्स फिल्म असल्याचे सांगण्यात येत आहे. या चित्रपटातून भारत बायोटेक आणि इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च यांच्या प्रवासाविषयी सांगण्यात येणार आहे.
 
 
 
 
गेल्या वर्षी 'द काश्मीर फाईल्स' या चित्रपटातून काश्मीरच्या खोऱ्यातील कश्मिरी पंडितांची कशाप्रकारे हत्या करण्यात आली तसेच त्यांना हाकलण्यात आले याविषयी अग्निहोत्रींनी भाष्य केले होतेआता 'द व्हॅक्सीन वॉर'मध्ये एका वेगळ्याच विषयाला अग्निहोत्री यांनी गवसणी घातली आहे.