अजित पवार गटाचे नेते नवाब मलिकांच्या भेटीला!

    15-Aug-2023
Total Views |
 
Nawab Malik
 
 
मुंबई : राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते नवाब मलिक यांना जामीन मंजूर झाला आहे. दोन महिन्यांच्या जामीनावर नवाब मलिक बाहेर आहेत. राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर मलिक कोणत्या गटात सामील होणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे. यातच आता अजित पवार गटातील काही नेते नेते नवाब मलिकांच्या भेटीला गेले आहेत.
 
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खासदार प्रफुल्ल पटेल, अजित पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर, अजित पवार गटाच्या युवक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांच्यासह राष्ट्रवादीचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.