
शासकीय धोरणांमुळे भारत जगातील ३ क्रमांकाची इकोसिस्टीम बनेल - मोदी
नवी दिल्ली: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून सलग दहाव्यांदा स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर लाल किल्ल्यावर जनसंबोधन केले. भाषणात बोलताना शासकीय योजना आणि धोरणांमुळे भारताची इकोसिस्टीम तिसऱ्या क्रमांकाची इकोसिस्टीम बनेल असे विधान मोदी यांनी केले .
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर १५ ऑगस्टला देशाचे पंतप्रधान परंपरागत लाल किल्ल्यावरून आपले मनोगत जनतेसमोर व्यक्त करतात. या पारंपरिक सोहळ्याला उपस्थित राहून मोदींनी चौफेर फटकेबाजी केली. भारतातून निर्यातीत होणारी वाढ,उत्पादनात वाढ,औद्योगिकीकरण तसेच भारतीय अर्थव्यवस्था वेगाने वाढ असल्याचे सुतोवाच केले.
'सरकारने भ्रष्टाचाराला आळा, महागाईवर नियंत्रण आणि विकासासाठी अनेक मार्ग अवलंबले. 'रिफॉर्म,परफॉर्म,ट्रान्सफॉर्म' या मुलमंत्राने आपल्या देशाची जडणघडण होत आहे. १४० कोटी भारतीयांच्या संयुक्त प्रयत्नाने भारत दहाव्या नंबर वरून पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनली आहे.'असे मोदी म्हणाले.
स्टार्टअप बाबतीत टिअर २, ३ शहरांतील तरूणांनी केलेल्या रोजगारनिर्मितीसाठी मोदींनी त्यांचे विशेष कौतुक केले. उद्योगधंदे रोजगार निर्मिती, तंत्रज्ञान, मुलभूत सुविधा ही आपल्या सरकारची प्रमुख उद्दिष्ट असल्याचे मोदींनी अर्थव्यवस्थेबाबत बोलताना नमूद केले आहे.