मुंबई : महाराष्ट्राची सुन अशी ओळख असणाऱ्या जिनीलिया देशमुखने सासरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त भावूक पोस्ट केली आहे. जिनिलिया आणि विलासराव यांच्यात खूप चांगलं नातं होतं. ती देशमुख कुटुंबाची मुलगीच झाली. असं असताना अचानक वडिलांसारखी माया करणारे विलासराव गेले आणि आपलं मायेचं छत्र हरवल्याच्या भावना तिने व्यक्त केल्या.
जिनिलियाने सासऱ्यांसाठी तिच्या आणि रितेशच्या लग्नातील फोचो शेअर करत लिहिलं, 'प्रिया बाबा, मला फक्त तुम्हाला हे सांगायचं आहे की तुम्ही खूप चांगले आहात, तुमचा विचार करायला आम्हाला आवडतं पण तुमच्याशिवाय आयुष्य जगणं हे खूप कठीण आहे. मला माहितीये तुम्ही जिथे कुठे आहात ती जागा नक्कीच खूप खास असली पाहिजे. कारण तुमच्यात ती ताकद आहे ज्यामुळे तुम्ही दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हसू फुलवू शकता. आम्हाला तुमची खूप आठवण येते. आपण पुन्हा भेटत नाही तोपर्यंत खूप खूप प्रेम.'