मानव बिबट संघर्ष नियंत्रणासाठी ‘मुंबईकर’ सरसावले

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात अग्निशमन दलासाठी सत्र

    13-Aug-2023   
Total Views |


MfSGNP


मुंबई (समृद्धी ढमाले): ‘मुंबईकर्स फॉर एसजीएनपी’ (MfSGNP) या वनविभागाच्या एका प्रकल्पांतर्गत लिव्हिंग विथ लेपर्ड्स हे जनजागृती सत्र आयोजित केले होते. मुंबई आणि परिसरातील अग्निशमन दलाच्या जवानांसाठी आयोजित या सत्रात मानव बिबट संघर्ष आणि इतर गोष्टींबद्दल सांगण्यात आले. या सत्राला मुंबई अग्निशमन दलाचे उपमुख्य अग्निशमन अधिकारी डॉ. दिपक घोष उपस्थीत होते. तसेच संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या सहाय्यक वनसंरक्षक प्रियंका बरगे ही उपस्थीत होत्या.

मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बिबटे आणि त्यांच्यामुळे मानव व्याघ्र संघर्षात झालेली वाढ याविषयी आपण परिचीत आहोतच. हाच मानव बिबट संघर्षावर नियंत्रण आणण्यासाठी आणि त्यातील धोके कमी करण्यासाठी ‘मुंबईकर्स फॉर एसजीएनपी’ जनजागृती करणारी सत्र घेत असते. यात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या अधिकाऱ्यांसमवेत उद्यानातील NIC सभागृह आणि बचाव केंद्रामध्ये हे सत्र शुक्रवार दि.११ ऑगस्ट रोजी आयेजित करण्यात आले होते. मुंबई फायर ब्रिगेड यांच्या नेतृत्वाखाली अग्निशमन केंद्रातील प्रभारी अधिकाऱ्यांसह ३० हून अधिक अग्निशमन कर्मचारी उपस्थीत होते.

मुंबई अग्निशमन दलाच्या कर्मचार्‍यांना वन विभागाशी आणि कामाशी ओळख होण्यासाठी हे जनजागृती सत्र आयोजित करण्यात आले होते. या सत्रामध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या प्रदेशाची सविस्तर माहिती, अपघात किंवा मृत्यू प्रसंगी काय करावे आणि काय करू नये याची उदाहरणे समाजासाठीची जोखीम कमी करण्यासाठी प्रकल्पाचे सिद्ध यश ठळकपणे सांगणे या गोष्टींचा समावेश होता. या कार्यक्रमासाठी भूषण राज, अनिश ठाकूर, शैलेश राव, निकित सुर्वे आणि कृष्णा छाटपार हे ‘मुंबईकर्स फॉर एसजीएनपी’चे स्वयंसेवक उपस्थीत होते.


MfSGNP
“मुंबईची शान असलेल्या बिबट्यांना वाचवण्यासाठी वन अधिकारी आणि MfSGNP सोबत हे महत्वाचे सत्र होते. यामुळे अग्निशमन कर्मचार्‍यांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत होईल आणि कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत बचाव पथकाशी समन्वय वाढेल. भविष्यात वन कर्मचारी आणि स्वयंसेवी संस्थांसाठी फॉरेस्ट फायरवर सत्र आयोजित करण्याची योजना आहे.”
 - डॉ. दिपक घोष,
उपमुख्य अग्निशमन अधिकारी
मुंबई अग्निशमन दल
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

समृद्धी ढमाले

लेखिका रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेच्या पदवीधर आहेत. सध्या दै. 'मुंबई तरुण भारत'मध्ये पर्यावरण प्रतिनिधी म्हणून कार्यरत. यापूर्वी विविध 'ह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज', मुलाखती आणि इतर वार्तांकनासाठी काम. आवाज आणि सूत्रसंचालन या क्षेत्रांमध्ये काम आणि विशेष आवड.