मुंबई : जनसेवा समितीकडून अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर "वेध ईशान्य भारताचा - सांस्कृतिक,सामाजिक आणि राजकीय!" या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १४ ऑगस्ट २०२३ रोजी सायंकाळी, ठीक ७ वाजता जनसेवा समिती, विलेपार्ले अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित एक अभ्यापूर्ण व्याख्यानाचे आयोजन केले असून साठ्ये महाविद्यालय सभागृह, दीक्षित रोड, विलेपार्ले (पूर्व) येथे होणार आहे. यावेळी व्याख्याते म्हणून ईशान्य भारतात २० वर्षाहून अधिक काळ वास्तव्य केलेले संरक्षण आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक, अभ्यासक आणि लेखक नितीन गोखले यांचे व्याख्यान होणार आहे.
दरम्यान, ईशान्य भारताविषयी सर्वसाधारण समाजात अनभिज्ञता आढळते. येथील सात राज्याचा इतिहास, जनतेची सामाजिक जडणघडण व सांस्कृतिक वारसा याविषयी लोकांना फारच कमी माहिती असते. पण या भागाचे इतर प्रश्न, तेथील राजकीय वातावरण, सामाजिक वातावरण इत्यादी बाबींबद्दल वृत्तपत्रांमधेही उदासीनताच दिसून येते. सद्य काळात मणिपूर येथे घडत असलेल्या हिंसाचाराच्या घटनांनी सर्वांचे लक्ष आता ईशान्य भारताकडे वेधले आहे. अर्थात, या बातम्यांमध्ये राजकीय धुरळाच जास्त उडत असला तरी यानिमित्ताने ईशान्य भारताविषयी सर्वांच्या मनात कुतूहल निर्माण झाले आहे.
या पार्श्वभूमीवर जनसेवा समिती, विलेपारले यांच्यातर्फे ईशान्य भारताच्या सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय संघर्ष आणि आव्हानांचा अभ्यासपूर्ण मागोवा घेणार व्याख्यान आयोजित केले आहे. या व्याख्यानाकरिता प्रवेश विनामूल्य असून मोठ्या संख्येने लोकांनी उपस्थित राहावे असे आवाहन समितीकडून करण्यात आली आहे. तसेच, अधिक माहितीसाठी ९९८७५६५७३८ / ९८६९०७६६२३ या क्रमांकावर संपर्क साधावा.