मुंबई : भारतीय लष्कराची ताकद आता आणखी वाढणार आहे. आता लष्कराच्या ताफ्यात 'हेरॉन ड्रोन मार्क-2' येणार आहे. याच ड्रोन मार्कने अमेरिकेने अल कायदाचा प्रमुख अल जवाहिरी याला ठार केले होते. आता भारतीय हवाई दलालाही हेरॉन ड्रोन मार्क-2 असे गेम चेंजर अस्त्र मिळाले आहे.
इस्रायलमधून घेतलेले हेरॉन ड्रोन अनेक फिचरनी सुसज्ज आहेत. आगामी काळात तिन्ही सैन्यदलासाठी सज्ज ठेवण्यात येणार आहे, जेणेकरून गरज पडल्यास शत्रूवर आक्रमक हल्ला करता येईल. हेरॉन ड्रोन मार्क-2 हे उपग्रह-नियंत्रित ड्रोन आहे जे २५० किलो शस्त्रास्त्रांसह उड्डाण करू शकते.
हे थर्मोग्राफिक कॅमेरा, हवेतून निगराणी दृश्यमान, रडार यंत्रणा इत्यादींनी सुसज्ज आहे. ते बेसवरून उड्डान घेते आणि मिशन पूर्ण करून तळावर परत येते. हेरॉन ड्रोन लेझर गाईडेड बॉम्ब, हवेतून जमिनीवर, हवेतून हवेत आणि हवेतून हवेत रणगाडाविरोधी मार्गदर्शित क्षेपणास्त्रांनी सुसज्ज असणार आहेत.
एकदा हवेत उड्डाण केले की हेरॉन ड्रोन ३६ तास उड्डाण करण्यास सक्षम आहे आणि ते ३५ हजार फूट उंचीवर म्हणजे जमिनीपासून साडे दहा किलोमीटरवर सायलेंटमध्ये उड्डाण करत राहते. ते नियंत्रित करण्यासाठी, जमिनीवर एक ग्राउंड स्टेशन बनविले आहे, यामध्ये मॅन्युअल आणि स्वयंचलित नियंत्रण प्रणाली आहे.