
\\\
युट्यूबला भारतात १५ वर्ष पूर्ण
नवी दिल्ली : गेली काही वर्ष लोकांना भुरळ घातलेल्या युट्यूबला १५ वर्ष पुर्ण झाली आहेत. २००८ मध्ये युट्यूब भारतात सुरू झाले होते. आपल्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर प्रत्येकाचा मनात युट्यूब एक स्थान निर्माण केले आहे. व्हिडिओ अपलोडिंग कंटेंट लायब्ररी या संकल्पनेतून युट्यूब अल्पावधीतच मोठे यश मिळाले. सामान्य माणसापासून लहान थोरांपर्यंत पोहोचलेल्या युट्यूबची उपयुक्तता ही समाजाला लाभदायक ठरली आहे.
२०२३ मध्ये अनेक नवीन फिचर्स युट्यूबने लोकांपर्यंत आणली. नुकतेच युट्यूबने कंटेंटची वर्गवारी करुन नवीन गेट वे सुरु केला आहे. नवीन युजर इंटरफेस मध्ये व्हिडिओचे साधारण लिस्टिंग काढून सर्चचा पर्याय उपलब्ध करण्यात आला आहे. याशिवाय युट्यूब म्युझिक,युट्यूब किड्स हे प्लॅटफॉर्म आहेत. या माध्यमातून टिअर १,२ शहरात स्वतः चे हक्काचे व्यासपीठ युट्यूबने उपलब्ध करून दिली. अनेकांनी मोनेटायझेशन चा माध्यमातून स्वयंरोजगार निर्माण केला. ओटीटी स्पर्धेतही स्वतःचे वेगळेपण जपत युट्यूबने आजही आपली लोकप्रियता कायम ठेवली आहे .