सीमा हैदर जाणार पाकिस्तानला? तिकीटांचे फोटोही झाले सोशल मिडीयावर व्हायरल
12-Aug-2023
Total Views | 177
मुंबई : पाकिस्तानची सीमा ओलांडून भारतात आलेली सीमा हैदर देशात चर्चेचा विषय बनलेली आहे. पण याच दरम्यान एक नवीन बातमी समोर आली आहे. सीमा हैदरला पाकिस्तानला वापस जाण्यासाठी तिकीट काडून देण्यात आलेले आहे. समाजवादी पक्षाचे नेते अभिषेक सोम यांनी तिकिटांचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
या तिकीटासोबत त्यांनी सीमा आणि सचिन यांच्या कथेवर आधारित असलेल्या चित्रपटाचे पोस्टरही शेअर केले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर चित्रपटाच्या तिकीट आणि पोस्टरचा फोटो शेअर करत अभिषेक सोम यांनी लिहिले की, सीमा हैदर आणि देशाच्या गद्दारांना भारतात राहायला जागा मिळणार नाही, तुमच्या नायिकेसोबत पाकिस्तानात जा. अमित जानी यांना देशात हिंदू-मुस्लिम दंगल घडवायची आहे.
दिग्दर्शक-निर्माते अमित जानी सीमाच्या कथेवर चित्रपट बनवू इच्छित असल्याची बातमीही समोर आली होती. या चित्रपटाचे नाव 'कराची ते नोएडा' असे ठेवण्यात आले आहे. त्यांनी आता या चित्रपटासाठी ऑडिशन्स घेण्यास सुरुवात केली आहे. सीमाचे पती गुलाम हैदर यांनाही त्यांनी दिल्ली किंवा मुंबईला येण्यास सांगितले आहे.