जगात एका महिन्यात कोरोनाच्या १५ लाख नव्या केसेस : जागतिक आरोग्य संघटना

    12-Aug-2023
Total Views | 69
New Covid-19 variant EG.5 on the rise in US, other countries

मुंबई
: जगात कोरोनाने दोन वर्षांपूर्वी धुमाकूळ घातले होते. संपूर्ण जगास वेठीस धरणाऱ्या कोरोनाने विदेशात पुन्हा डोके वर काढल्याचे पाहायला मिळत आहे. संपूर्ण जगभरात १ महिन्यात कोरोनाची तब्बल १५ लाख नव्या केसेस समोर आल्या आहेत. याची सर्वसाधारण टक्केवारी पाहिली तर जवळपास ८० टक्के असल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, जगभरात कोरोनाच्या नवीन प्रकरणांमध्ये ८० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

दरम्यान, वाढत्या कोरोनाच्या टक्केवारी बाबत जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे की, याचे मुख्य कारण म्हणजे कमी झालेल्या चाचण्या आणि ओमिक्रॉनच्या नवीन प्रकारामुळे ही आकडेवारी वाढली असल्याचे डब्ल्यूएचओकडून स्पष्ट करण्यात आले आहे. डब्ल्यूएचओने वाढत्या केसेस पाहता ओमिक्रॉनचे सब-व्हेरियंट EG.5 या प्रकारातील असल्याचे उघड झाले आहे. या प्रकाराची प्रकरणे फक्त अमेरिका, चीन आणि ब्रिटनमध्ये आढळत असल्याचे आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे.

तसेच, दि. १० जुलै ते ६ ऑगस्ट यादरम्यान, तब्बल १५ लाख नवीन प्रकरणे नोंदवली गेली असून मागील २८ दिवसांच्या प्रमाणात ही आकडेवारी ७० टक्क्यांहून अधिक असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने निदर्शनास आणून दिले आहे. परंतु, सकारात्मक बाब अशी की, या काळात कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या ५७ टक्क्यांनी कमी झाली आहे, असेही डब्ल्यूएचओने म्हटले आहे.

दरम्यान, संयुक्त राष्ट्रांच्या एजन्सीनुसार, पश्चिम पॅसिफिक प्रदेशांमध्ये गंभीर बाब समोर आली असून तब्बल १३० टक्क्यांहून अधिक नव्या केसेस वाढल्या आहेत. यात प्रामुख्याने ऑस्ट्रेलिया, चीन, जपान, मलेशिया, तैवान, न्यूझीलंड सारख्या देशांचा समावेश होतो. दि. २७ जानेवारी २०२० रोजी भारतात पहिला कोरोना रुग्ण आढळला होता. तसेच, कोविडमुळे जगभरात सुमारे ७० लाख लोकांचा मृत्यू झाला आहे.






अग्रलेख
जरुर वाचा
उल्हासनगरात कचरा उचलणाऱ्या कामगारांचा काम बंद आंदोलनाचा इशारा

उल्हासनगरात कचरा उचलणाऱ्या कामगारांचा काम बंद आंदोलनाचा इशारा

उल्हासनगर शहरातील कचरा उचलणाऱ्या कोणार्क कंपनीच्या कर्मचाऱ्यांना एक महिना होऊनही अद्याप पर्यंत पगार न दिल्याने कामगारांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे . शुक्रवारी या कामगारांनी काम बंद आंदोलन सुरू केले. कामगाराच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या लढा कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप गायकवाड यांनी जोपर्यंत कामगारांना पगार देत नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन करण्याची भूमिका घेतल्याने शुक्रवारी कामगारांनी काम बंद आंदोलन केले. कामगारांनी सुरू केलेल्या या आंदोलनामुळे शहरात कचऱ्याचे ढीग साचलेले पाहायला मिळत आहेत. त्यामुळे ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121