'अंमली पदार्थमुक्त राज्य-मजबूत राज्य': मुख्यमंत्री योगी म्हणाले- 'अंमली पदार्थांचे व्यसन हे विनाशाचे कारण...'

    12-Aug-2023
Total Views |
Yogi Adityanath

लखनऊ
: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दि. १२ ऑगस्ट रोजी लखनऊमध्ये अंमली पदार्थमुक्त राज्य-सशक्त राज्य अभियानाचा शुभारंभ केला. यावेळी त्यांनी युवकांना आवाहन केले आहे की, नशेमुळे सर्वनाश होतो. त्यापासून दूर राहा.आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त त्यांनी तरुणांना शुभेच्छाही दिल्या. यानिमित्ताने त्यांनी ट्विट करून म्हटले की, 'आंतरराष्ट्रीय युवा दिना'निमित्त सर्व तरुण मित्रांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा!

तसेच या निमित्ताने ‘आत्मनिर्भर भारत-सक्षम भारत-आधुनिक भारत’ या निर्मितीच्या प्रवासाला अधिक सशक्त-समृद्ध बनवण्यात आपले योगदान देण्याचा संकल्प करूया, असे आवाहन ही योगी आदित्यनाथ यांनी केले. मुख्यमंत्री योगी यांनी आपल्या भाषणात सांगितले की, तरुणांनी स्वावलंबी झाले पाहिजे आणि त्यांच्या स्वावलंबनाने आपले राज्य आणि देश स्वावलंबी होण्याचे उद्दिष्ट साध्य करू शकतो, त्या दिशेने सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. युवकांनी आपली उर्जा विधायक कामात वापरली तर तुमचे भविष्य उज्ज्वल होईल, असे ते म्हणाले.