अखेर शहबाज शरीफ सत्तेतून पायउतार! पाकिस्तानला मिळाले नवे पंतप्रधान
12-Aug-2023
Total Views |
मुंबई : अनवर-उल-हक कक्कर यांची पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. निवर्तमान पंतप्रधान शहबाज शरीफ आणि विरोधी पक्षनेते राजा रियाझ यांच्यात झालेल्या चर्चेनंतर अन्वर-उल-हक कक्कर यांच्या नावावर सहमती बनली.
पंतप्रधान शहबाज आणि नॅशनल असेंब्लीमधील विरोधी पक्षनेते राजा रियाझ यांनी राष्ट्रपती आरिफ अल्वी यांना काळजीवाहू पंतप्रधान म्हणून अन्वर उल हक यांच्या नियुक्तीबाबत सल्ला पाठवला आहे. पंतप्रधान कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, बलुचिस्तानचे सिनेटर अन्वर-उल-हक कक्कर यांची काळजीवाहू पंतप्रधान म्हणून निवड करण्यात आली आहे. ते आज (शनिवारी) शपथ घेण्याची शक्यता आहे.
९ ऑगस्ट रोजी संसदेचा कार्यकाळ संपवल्यामुळे संसद विसर्जित करण्यात आली होती. संसदेच विसर्जन झाल्याबरोबरच पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचा कार्यकाळही संपुष्टात आला होता. अशा परिस्थितीत आज कार्यवाहक पंतप्रधान निवडीची शेवटची तारीख होती.