मुंबई : मागील अनेक काळापासून प्लास्टिक विरोधी कारवाईचे बिगुल मुंबई महापालिकेकडून अनेकदा वाजवण्यात आले आहे. मात्र मुंबईतील प्लास्टिक काही बंद झाल्याचे दिसून आलेले नाही. अशातच आता १५ ऑगस्टनंतर प्लॅस्टिक पिशवी वापरल्यास प्लॅस्टिक पिशवी विक्रेत्या दुकानदारांसह फेरीवाले आणि ग्राहकांवर कारवाई करण्यात येणार असून सुमारे पाच हजारांचा दंड ठोठावण्यात येणार आहे.
तसेच याकरिता पालिकेकडून तीन अधिकारी, एक पोलीस आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्याचे स्वतंत्र पथक नेमण्यात आले असून प्लॅस्टिक कचरा जलवाहिन्या आणि मॅनहोलमध्ये अडकल्यामुळेच अनेक भागांत पाणी तुंबल्याचे निदर्शनास आल्यामुळे प्लॅस्टिककिरोधी कारवाई तीव्र करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या एका अधिकाऱ्याने दिली आहे.
या गोष्टींवर असणार आहे बंदी
- प्लास्टिक कॅरी बॅग
- पॉलिथीन (७५ मायक्रोनपेक्षा कमी जाडीच्या)
- फुग्यांसाठी वापरली जाणारी प्लास्टिक स्टिक आणि कँडी स्टिक
- थर्माकोल (पॉलिस्ट्रिन)
- प्लास्टिकच्या प्लेट, कप, ग्लास, चमचे, चाकू, स्ट्रॉ, ट्रे
- मिठाईच्या डब्ब्यांना लावण्यात येणारा प्लास्टिकचा कागद
- इन्विटेशन कार्ड
- सिगरेटचं पॅकेट
- १०० मायक्रॉनहून कमी प्लास्टिक किंवा पीवीसी बँनर
- स्टिरर