बागेश्री घालेल श्रीलंकेला वळसा ?

    01-Aug-2023   
Total Views |



bageshri


मुंबई (विशेष प्रतिनिधी): रत्नागिरीत टॅग केलेल्या बागेश्री या ऑलिव्ह रिडले कासवीणीने श्रीलंकेचा टप्पा गाठुन आता ती पुढे गेली आहे. अधिक पुर्वेकडे प्रवास सुरू ठेवत श्रीलंकेच्या कलमुनाई शहरापासुन ती २०० किलोमिटर आत पाण्यात आहे.


कोकणातील रत्नागिरीमध्ये टॅग करण्यात आलेल्या ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या दोन समुद्री कासवांना सॅटेलाईट टॅग लावण्यात आले होते. बागेश्री आणि गुहा अशी या दोन्ही कासवांची नावे असुन त्यांच्या समुद्र सफरीवर सर्वांचेच लक्ष आहे. गुहा या लक्षद्वीप पर्यंत पोहोचलेल्या कासवीणीशी सॅटेलाईट संपर्क तुटलेला असल्यामुळे तिचे स्थान सध्या कळत नाही. लक्षद्वीपजवळ असलेल्या कासवीणीच्या सॅटेलाईट ट्रान्समीटरने रविवार दि. २३ जूलैपासुन प्रतिसाद देणं थांबवलं आहे. गुहा कासवीणीने टॅग केल्यानंतर १५५ दिवस आपले संकेत ट्रान्समीटर द्वारे दिले मात्र, आता तिच्याशी संपर्क तुटलेला आहे.


पण, बागेश्री या कासवीणीने गोवा, केरळ, श्रीलंका गाठत आता ती श्रीलंकेलाही वळसा घालते की काय अशी स्थिती आहे. या कासवीणीचा टॅग अजुनही कार्यन्वीत असल्यामुळे तसेच तिने खुप लांबचा पल्ला गाठल्यामुळे संशोधकांचे तिच्या भ्रमणमाग्राकडे डोळे लागले आहेत. तिच्या भ्रमंतीच्या मार्गावर आणि ती यानंतर वीणीच्या हंगामात कोणता समुद्र किनारा जवळ करते हे पाहणं अभ्यासकांसाठी महत्त्वाचं ठरणार आहे.


समृद्धी ढमाले

लेखिका रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेच्या पदवीधर आहेत. सध्या दै. 'मुंबई तरुण भारत'मध्ये पर्यावरण प्रतिनिधी म्हणून कार्यरत. यापूर्वी विविध 'ह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज', मुलाखती आणि इतर वार्तांकनासाठी काम. आवाज आणि सूत्रसंचालन या क्षेत्रांमध्ये काम आणि विशेष आवड.