हरियाणा हिंसाचार! कट्टरपंथीयांनी २५०० हिंदू महिलांना धरले वेठीस

    01-Aug-2023
Total Views |
mevat 
 
चंडीगड : हरियाणाच्या मेवातमध्ये, जलाभिषेक यात्रेवर कट्टरपंथीयांनी हल्ला केला. या यात्रेत हजारो महिलांचाही सहभाग होता. या महिलांना कट्टरपंथीयांनी सुमारे ५ तास वेठीस धरले होते. अखेर पोलिसांनी त्यांना सुखरूप बाहेर काढले आहे. मेवातमधील नुहानपासून सुरू झालेला हिंसाचार गुरुग्राममधील सोहनापर्यंत पसरल्यानंतर राज्यातील भाजप सरकारने मेवात, गुरुग्राम, फरिदाबाद आणि रेवाडी जिल्ह्यात कलम १४४ लागू केले आहे.
 
यासोबतच येथे इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नूहमध्ये निमलष्करी दल तैनात करण्यात आले आहे. त्याचवेळी मुस्लिम जमावाने ब्रजमंडल जलाभिषेक यात्रेवर हल्ला केला आणि हजारो हिंदू महिला आणि लहान मुलांना घेरले.
 
अखेर एडीजी ममता सिंग यांच्या नेतृत्वाखाली अथक परिश्रमानंतर त्यांना बाहेर काढण्यात आले. हरियाणाचे गृहमंत्री अनिल विज यांनी सांगितले की, पोलिसांनी नूह येथील शिव मंदिरात आश्रय घेतलेल्या सुमारे २,५०० महिला आणि मुलांची सुटका केली आहे. त्यांनी लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले. दरम्यान, 'हरियाणा एक हरियाणवी एक' हे तत्व लोकांनी लक्षात ठेवावे, असे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर म्हणाले.
 
या हिंसाचारात डझनभर वाहने जाळण्यात आली आहेत. त्याचवेळी गोळीबारात दोन होमगार्ड जवान आणि एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे. कट्टरपंथीयांच्या हिंसाचारात २० हून अधिक पोलिस जखमी झाल्याची माहिती आहे. डीएसपी सज्जन सिंग यांच्या डोक्यात गोळी लागली आहे. त्याचवेळी एका इन्स्पेक्टरच्या पोटात गोळी लागली. गोवंश तस्करी आणि लुटीसाठी कुख्यात कटरपंथीय बहुल मेवात भागावर प्रशासन लक्ष ठेवून आहे.