शेवटच्या दिवशी ६.५ करोड इन्कम टॅक्स रिटर्न फाईल
नवी दिल्ली - आर्थिक वर्ष २२-२३ मध्ये शेवटच्या दिवसापर्यंत ६.५ करोडहून अधिक इन्कम टॅक्स रिटर्न फाईल झाले आहेत. सोमवारी संध्याकाळपर्यंत ३६.९१ लाख आयटीआर फायलींग झाल्या आहेत. आयटी डिपार्टमेंटचा निवेदनात १.७८ कोटी लोकांनी संकेतस्थळावर लॉगिन केल्याचे सांगितले आहे.
यावेळी इन्कम टॅक्स विभागाकडून कर भरण्यासाठी चांगल्याप्रकारे जनजागृती केली गेली होती. सोमवारी रिटर्न भरायची शेवटची मुदत दिली होती. मागच्या वर्षी ५.८३ कोटी लोकांचे इन्कम टॅक्स रिटर्न फाईल झाले होते. रिटर्न फाईल भरताना अडचणी येऊ नयेत यासाठी विभागाकडून सर्व स्तरावर तांत्रिक सहाय्य नागरिकांना दिले जात आहे. कर तज्ञांच्या मते महसूल विभागाने केलेल्या परिश्रमातून यंदा आयटीआर फाईलिंग वाढले आहे.
संशयित रिस्की अकाऊंट मॉनिटर करण्यासाठी तांत्रिक सहाय्य आणि तंत्रज्ञानाचा वापर व्यवस्थापन करत असल्याचे समजते आहे.खासकरून सर्व स्तरावरील व्यवहारावर,आवक जावक, खरेदी विक्री व आर्थिक साधने या 'स्पेसिफाईड फायनाशिअल ट्रांजक्शन ' वर विभागाने करडी नजर ठेवली आहे