भोपाल : मध्य प्रदेशात इंदूरमधील खुड़ैल भागात वनवासी समाजातील घरमालकाच्या १३ वर्षीय मुलीवर तीन कट्टरपंथी तरुणांनी सामूहिक बलात्कार केला. गट्टू खान, ईदू खां, शेरु खान या तिन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. दि. ७ जुलै रोजी पोलीस-प्रशासनाने बुलडोझर चालवून आरोपीचे घर पाडले आहे. तिन्ही आरोपी खुड़ैल भागात बांधकाम मजूर म्हणून काम करायचे. येथेच या तिघांनी घरमालकाच्या १३ वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. दरम्यान हिंदू मुलीशी शारीरीक संबध ठेवल्यास जन्नतमध्ये जागा मिळत असल्याने हा बलात्कार केल्यांचे आरोपी गट्टू खान याने सांगितले आहे.
एसपी (ग्रामीण) हितिका वासल यांनी सांगितले की , ही घटना दि. ६ जुलै रोजी दुपारी घडली. पीडित तरुणीची आई शेतात घर बांधकामांची देखरेख करत होती. यावेळी ठेकेदार अश्रफने . गट्टू खान, ईदू खां, शेरु खान या तीन आरोपींना लोखंडी सळ्या कापण्यासाठी बोलावले होते.
दरम्यान एसपीच्या म्हणण्यानुसार, दुपारी मुलीची आई काही कामासाठी जुन्या घरात गेली होती आणि मुलगी घरात एकटी होती. मुलगी एकटी असल्याचे पाहून गट्टूने तिचा गळा आवळून टेरेसवर नेला. तिथे तिच्यावर बलात्कार केला. या वेळी इतर दोन आरोपी खाली उभे राहून लक्ष ठेवून होते.या घटनेने मुलगी घाबरली आणि जोरजोरात रडू लागली. मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकून तिचे आजोबा आले. त्यावेळी गट्टू खानने त्याच्यावर हल्ला केला आणि तिथून पळून गेला. त्यानंतर मुलगी आजोबांकडे धावत गेली. पण घडलेल्या प्रसंगाची माहिती तिने आजोबांना न सागंता . आपल्या आईला सांगितला.
यानंतर पीडितेची आई पीडितेला घेऊन पोलीस स्टेशनला गेली. त्यानंतर एसपी हितिका यांनी स्वतः पोलिस स्टेशन गाठले आणि पीडितेशी बोलणे केले. त्यावेळी पीडितेने सांगितले की, २०-२२ वर्षांच्या तरुणाने तिला पाणी पीत असताना पाहिले आणि तोंड दाबून टेरेसवर नेले. तिने आरडाओरडा सुरू केल्यावर त्याने तिचा गळा दाबला.
पोलिसांनी ठेकेदार अश्रफ याला ताब्यात घेऊन चौकशी केली. यानंतर अश्रफने तिन्ही आरोपींची नावे व पत्ते सांगितले. पोलीस गावात पोहोचण्याआधीच तिन्ही आरोपींनी मोबाईल बंद करून पळ काढला. त्याच्या कुटुंबीयांची कडक चौकशी केल्यानंतर तिघांनाही जंगलातून अटक करण्यात आली.
अहवालानुसार, तपास अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपी गट्टू सुरूवातीला बलात्कार केला नसल्याचे सांगत होता. मात्र कडक कारवाईनंतर त्यांने पोलीसांना सर्व माहिती दिली. दरम्यान हिंदू मुलीशी शारीरीक संबध ठेवल्यास जन्नतमध्ये जागा मिळते , अशी धक्कादायक माहिती आरोपीने सांगितली.