नेदरलँडच्या पंतप्रधानांनी दिला राजीनामा , सरकार कोसळले!

    08-Jul-2023
Total Views |
Dutch Prime Minister Mark Rutte resigns after ​13 years in power as government collapses


नवी दिल्ली
: नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रुटे यांनी दि. ८ जुलै रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. यामुळे नेदरलँडचे सरकार कोसळले आहे. नेदरलँडमध्ये दोन पक्षांच्या युतीने सरकार स्थापन केले होते. मात्र मायग्रेशन पॉलिसीबाबत या दोन्ही पक्षांचे एकमत होत नव्हते. सततचे वाद होत असल्यामुळे ही युती मोडली. त्यानंतर डच पंतप्रधान मार्क यांनी आपला राजीनामा सादर केला. किंग विल्यम अॅलेक्झँडर यांच्याकडे त्यांनी राजीनामा दिला आहे.
 
पंतप्रधान रुटे यांच्या सरकारने या आठवड्यात नेदरलँड्समधील युद्ध निर्वासितांच्या नातेवाईकांची संख्या दरमहा २०० लोकांपर्यंत मर्यादित ठेवण्याची तरतूद असलेल्या योजनेची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र आघाडी सरकारमध्ये सहभागी असलेल्या मित्रपक्षांनी याला कडाडून विरोध केला. हा निर्णय आपल्यासाठी खूप कठीण असल्याचे सांगत रुटे यांनी आपल्या मंत्रिमंडळाचा राजीनामा जाहीर केला. ते म्हणाले, युतीच्या भागीदारांमधील मतभेद दूर करता येणार नाहीत. ते म्हणाले की सर्व बाजूंनी तोडगा काढण्यासाठी खूप प्रयत्न केले, परंतु दुर्दैवाने स्थलांतर धोरणावरील मतभेद दूर करणे अशक्य आहे.