पवारांचा विचार घेऊनच आम्ही पुढे : रुपाली चाकणकर

    05-Jul-2023
Total Views |
Rupali Chakankar on Sharad Pawar

मुंबई
: राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंड करत फडणवीस-शिंदे सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अजित पवार गट आणि शरद पवार गटातील दोन्ही नेते आमनेसामने आले आहेत. दरम्यान दि. ५ जुलै रोजी वांद्रे येथील एमईटी कॉलेच्या मैदानावर अजित पवार गटाच्या बैठकीला सुरूवात होणार आहे. त्याचवेळी रुपाली चाकणकर एमईटी कॉलेज येथे दाखल झाल्या आहेत. यावेळी माध्यमांशी बोलताना रुपाली चाकणकर म्हणाल्या की, पवार यांनी घेतलेला निर्णय योग्यच आहे. त्यामुळे हे सांगण्यासाठीच आम्ही येथे आलो आहोत. मात्र शरद पवार हे आमचे आदर्श होते आणि राहतील. म्हणूनच शरद पवारांचा विचार घेऊनच आम्ही पुढे जाणार आहोत, असे चाकणकर म्हणाल्या.

05 July, 2023 | 11:31

दरम्यान महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार विरुद्ध अजित पवार हा वाद एका नव्या वळणावर आलेला आहे. शरद पवारांनी अजित पवार यांच्या वांदे येथील बैठकीत आपले फोटो लावू नये , असे सांगितले आहे. त्यावर आता छगन भुजबळ मवाळ भुमिका घेत म्हणाले की, शरद पवार आमचे गुरू आहेत. त्यामुळे शरद पवारांचे फोटो आमच्या स्टेजवर लावले आहेत. तसेच शरद पवार आमचे गुरू असल्याने त्यांनी आम्हाला बोलवले तर अजित पवारांनाही सोबत घेऊन आम्ही भेटीसाठी जाऊ , असे ही भुजबळ म्हणाले.

05 July, 2023 | 11:31