नवी दिल्ली : समाजमाध्यमात एक व्हिडीओ दि.४ जुलै रोजी व्हायरल होत आहे. या व्हिडीओत गुरुद्वारामध्ये एक व्यक्ति आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने बकऱ्यांचे शीर कापताना दिसतो. इतक्या निर्दयीपणे गुरूद्वारासारख्या पवित्र धार्मिक स्थळावर घडलेल्या घटनेमुळे सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. बऱ्याच लोकांनी हा व्हिडीओ शेअर करत हा व्हिडीओ कुठल्य़ा गुरूद्वारेतील आहे, यांची चौकशी करण्यास सांगितले आहे. मात्र अद्याप ह्या व्हिडीओबाबत कोणतीही माहिती उघड झालेली नाही.
दरम्यान बकरी ईदपुर्वीच मुंबईतील एका भागात मुस्लिम व्यक्तिने हलालसाठी २ बकरे आपल्या राहत्या घरी आणले. परंतु यामुळे आजूबाजूचे लोक संतप्त झाले. त्यावेळी मीरा रोडवर असलेल्या हाऊसिंग सोसायटीतील लोकांनी हनुमान चालिसाचे पठण केले आणि निदर्शनेही केली. या प्रकरणाचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. यामध्ये मोहसीन शेख नावाच्या व्यक्तीने दोन बकरे घरी आणल्याचे पाहायला मिळते.त्यामुळे सोसायटीतील सदस्य संतापले. यानंतर तेथे मोठ्या संख्येने लोक जमा झाले आहेत.
मोहसीन शेख यांचा दावा आहे की, महाराष्ट्राच्या राजधानीत असलेल्या या गृहनिर्माण संस्थेत २००-२५० मुस्लिम कुटुंबे राहतात. निवासी सोसायटीच्या बिल्डरने मुस्लिमांना दरवर्षी बकऱ्या पाळण्यासाठी स्वतंत्र जागा दिली असल्याचा दावा त्यांनी केला. मात्र, यावर्षी बिल्डरने त्यांना पूर्वीप्रमाणे बकरे ठेवण्यासाठी स्वतंत्र जागा देण्यास नकार दिला. असे असतानाही मोहसीन खानने एक बकरा चक्क आपल्या घरात आणला.
04 July, 2023 | 13:7
मोहसीन शेख सांगतात की, जेव्हा सोसायटीने त्यांना बकऱ्यासाठी ठेवलेल्या जागेचा वापर करू देण्यास नकार दिला तेव्हा तो बकऱ्या घेऊन घरी आला. मात्र या बकऱ्यांची कत्तल हाऊसिंग सोसायटीच्या आवारात करणार नसल्याचे मोहसीन शेख यांने सांगितले आहे.मात्र परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने मुंबई पोलिसांना या प्रकरणात हस्तक्षेप करावा लागला. पोलिसांनी सोसायटीच्या रहिवाशांना आश्वासन दिले की परिसरात जनावरांची कत्तल होऊ दिली जाणार नाही.
यानंतर लोक शांत झाले. नियमानुसार निवासी सोसायटीच्या आवारात जनावरांची कत्तल करता येत नाही. मोहसीन शेखने नियमांचे उल्लंघन करण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. यानंतर मोहसीन शेख याने आपले बकरे हाऊसिंग सोसायटीतून बाहेर काढल्या आहेत. ही घटना दि.२७ जून रोजी घडली, जेव्हा लोकांनी विरोध करण्यास सुरुवात केली. या प्रकरणी ११ जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला होती.