राष्ट्रवादीच नव्हे तर आणखी पक्ष भाजपसोबत येणार! केंद्रीय मंत्र्यांचं मोठं विधान
04-Jul-2023
Total Views |
मुंबई : राज्याच्या राजकारणात नुकत्याच घडलेल्या सत्तानाट्यानंतर आता केंदीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी धक्कादायक वक्तव्य केले असून ते म्हणाले, देशाच्या विकासासाठी अनेक राजकीय पक्षांना एनडीएमध्ये सामील व्हायचे आहे. ते पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देशाच्या विकासासाठी अनेक विरोधी पक्षांना एनडीएमध्ये सामील व्हायचे आहे, असे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले.
दरम्यान, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर पुढे म्हणाले, देशाच्या विकासासाठी अनेक राजकीय पक्षांना एनडीएमध्ये सामील व्हायचे असून राष्ट्रवादी काँग्रेसने यासाठी पुढाकार घेतला असल्याचे ठाकूर यांनी सांगितले. तसेच, आपल्याला विश्वास आहे की, अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसचा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात समावेश झाल्याने राज्याच्या विकासाला मदत होईल, असेही त्यांनी सांगितले. आगामी लोकसभा निवडणुका लक्षात घेता एनडीएमध्ये सामील होणारे पक्ष देशाच्या विकासासाठी केंद्रात एक मजबूत आणि स्थिर सरकार देतील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.